सत्यध्येय एकविचार शिरपूर | प्रतिनिधी
शिरपूर शहर पोलीस ठाण्याने मंदिर चोरीच्या मालिकेचा पर्दाफाश करत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. मध्यप्रदेशातील दोन सराईत मंदिरफोड्या आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून ४ किलो १९९ ग्रॅम वजनाची चांदीची आभूषणे, रोख रक्कम व चोरीसाठी वापरलेली साधने असा एकूण ₹७ लाख ८३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईमुळे धुळे व नाशिक जिल्ह्यातील मंदिर चोरी व घरफोडीचे एकूण सहा गुन्हे उघडकीस आले असून, धुळे येथील रोकडोबा हनुमान मंदिर परिसरातील श्रीराम मंदिरातील बहुचर्चित चोरीचाही उलगडा करण्यात शिरपूर शहर पोलिसांना यश आले आहे.या प्रकरणाची सुरुवात दि. ३० जून २०२६ रोजी रात्री ते १ जुलै २०२६ रोजी सकाळी दरम्यान सावळदे (ता. शिरपूर) येथील दत्त मंदिराची दानपेटी फोडून त्यातील अंदाजे ₹२२ ते ₹२५ हजारांची रोकड चोरून नेल्यापासून झाली. याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३२०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३३१(४) व ३०५(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री. किशोरकुमार परदेशी यांनी गुन्हे शोध पथकाला तातडीने तपासाचे आदेश दिले. त्यानुसार पथकाने मंदिर परिसर व परिसरातील असंख्य सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, तांत्रिक विश्लेषण, गोपनीय बातमीदारांचे जाळे सक्रिय करणे आणि नियोजनबद्ध तपास सुरू केला. अत्यंत संयमाने आणि कौशल्याने केलेल्या तपासातून आरोपींचा माग मध्यप्रदेश राज्यातील बडवाणी जिल्ह्यातील सेंधवा तालुक्यातील नवाडफल्या व नाहलाफल्या येथे लागला.तेथून सदीम गिलदार देवका (वय २७, रा. नवाडफल्या, मोहाला, ता. सेंधवा, जि. बडवाणी, मध्यप्रदेश) आणि भिकला रामसिंग देवका (वय ३९, रा. नाहलाफल्या, मोहाला, ता. सेंधवा, जि. बडवाणी, मध्यप्रदेश) या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. सखोल चौकशीत त्यांनी सावळदे दत्त मंदिरासह धुळे व नाशिक जिल्ह्यातील विविध मंदिरांमध्ये चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर दोघांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना दि. ३१ जुलै २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.पोलीस कोठडीत आरोपींनी शिरपूर शहरातील शहादा रोडवरील एका घरात, सावळदेजवळील एका झोपडीत, सावळदे दत्त मंदिरात, धुळे येथील रोकडोबा हनुमान मंदिर परिसरातील श्रीराम मंदिरात, मालेगावजवळील रामदेव महाराज मंदिरात तसेच सटाणा येथील साईबाबा मंदिरात चोरी केल्याची कबुली दिली.या कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून ₹१९,३०० रोख रक्कम, १,१३१ ग्रॅम वजनाचा चांदीचा घोडा, ८२० ग्रॅम वजनाचे ७८ चांदीचे घोडे, १,२६९ ग्रॅम वजनाचे पाच चांदीचे मुकूट, ६०१ ग्रॅम वजनाच्या तीन चांदीच्या पाटल्या, ३५१ ग्रॅम वजनाचे चांदीचे कडे, जोडवे, ब्रेसलेट, चैन, हार, छत्री, नाग तसेच चोरीसाठी वापरलेली लोखंडी टॅमी, स्पॅनर व पेंचीस असा एकूण ₹७,८३,४०० किमतीचा मुद्देमाल जप्त केला.या तपासामुळे शिरपूर शहर पोलीस ठाणे गु.र.नं. २५२/२०२६, २५६/२०२६ व ३२०/२०२६, धुळे तालुका पोलीस ठाणे गु.र.नं. ३१६/२०२६, मालेगाव तालुका पोलीस ठाणे गु.र.नं. ६३९/२०२६ आणि सटाणा पोलीस ठाणे गु.र.नं. २७१/२०२६ असे एकूण सहा गुन्हे उघडकीस आले आहेत.ही संपूर्ण यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री. विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक श्री. अनिल तथा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत **शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. किशोरकुमार परदेशी, पोलीस उपनिरीक्षक श्री. जितेंद्र महाजन तसेच पोलीस अंमलदार रविंद्र पाटील, योगेश दाभाडे, गोविंद कोळी, विनोद आखडमल, मनोज महाजन, सचिन वाघ, प्रशांत दाभाडे, भटू साळुंखे, आरिफ तडवी, सोमा ठाकरे, उमेश पवार, अनिता पावरा, चित्रा पावरा आणि इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रमपूर्वक तपास करून ही उल्लेखनीय कामगिरी यशस्वी केली. या कारवाईमुळे मंदिर चोरी करणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश झाला असून, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक बळकट झाली आहे.
![]()
