पुणे : वडगाव शेरी, पुणे येथील सुप्रसिद्ध निसर्गोपचार तज्ञ सौ. वृषाली विश्वास पांडे यांच्या निसर्गोपचार क्षेत्रातील कार्याची दखल घेत त्यांना प्रतिष्ठेचा ‘निसर्गोपचार गौरव सन्मान २०२६’ प्रदान करण्यात आला. रविवार, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी बुलडाणा येथील भातृमंडळ हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या विशेष सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला.आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन, ए.जी.एम.ए. तसेच योगा निसर्गोपचार चिकित्सक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. निसर्गोपचार क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्रातील शेकडो तज्ञांची या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती होती. त्यामुळे हा सोहळा निसर्गोपचार क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीने विशेष ठरला.या कार्यक्रमाला बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. संजयभाऊ गायकवाड, बुलडाणा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ. पूजाताई गायकवाड, डॉ. सचिन सुपे, डॉ. त्रिदीप गुहा, डॉ. प्रशांत कपाले तसेच एमजीएम विद्यापीठाच्या योगा विभागाचे प्रमुख श्री. गंगाप्रसाद खरात यांची प्रमुख उपस्थिती होती.मंचावर आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे व्हाईस चेअरमन श्री. नितीनराजे पाटील, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाबुराव कानडे, सौ. दिशा चव्हाण, श्री. विजय नवल पाटील, श्री. विनोद ढोबळे, श्री. रावसाहेब घोडेगाव, श्री. रामेश्वर शिंदे, श्री. श्रीकांत अंजुटगी, श्री. भानुदास परबत, श्री. अशोक देवकर यांच्यासह असोसिएशनचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.निसर्गोपचार ही भारतीय आरोग्यपरंपरेशी निगडित असलेली उपचारपद्धती असून, या क्षेत्रात कार्य करणाऱ्या तज्ञांच्या योगदानाचा गौरव करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात सौ. वृषाली विश्वास पांडे यांना सन्मानचिन्ह व गौरव प्रदान करण्यात आला.वडगाव शेरी परिसरातून निसर्गोपचार क्षेत्रात कार्यरत असलेल्या सौ. वृषाली पांडे यांना मिळालेला हा सन्मान त्यांच्या कार्याची दखल घेणारा ठरला आहे. त्यांच्या या गौरवामुळे पुणे तसेच वडगाव शेरी परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, निसर्गोपचार क्षेत्रातील मान्यवर, सहकारी, हितचिंतक आणि नागरिकांकडून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
‘निसर्गोपचार गौरव सन्मान २०२६’ हा केवळ व्यक्तिगत गौरव नसून निसर्गोपचार क्षेत्रात कार्य करणाऱ्या तज्ञांच्या योगदानाला मिळालेली व्यापक मान्यता असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
![]()
