सत्यध्येय एकविचार शिंदखेडा (यादवराव सावंत)प्रतिनिधी:-
निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीत पारदर्शकतेची मागणी करण्यासाठी शांततापूर्ण मागनि निघालेल्या लोकप्रतिनिधींना रोखणे व ताब्यात घेणे ही लोकशाहीवर घाला घालणारी बाब आहे, असा आरोप करत शिंदखेडा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसील रात्र कार्यालयासमोर ‘काळा दिवस’ पाळत निदर्शने केली यावेळी कार्यकत्यांनी दंडाला काळ्या फिती लावून केंद्र सरकारच्या दडपशाहीचा तीव्र निषेध नोंदवला. या संदर्भात शिंदखेडा तालुक्याच्या वतीने नायब तहसीलदार यांना मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. निवडणूक आयोगाला भेटण्यासाठी जात असलेले काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियंका गांधींवरील अटकेचा त्यांनी निषेध केला.
निवेदनातील मागण्या
लोकप्रतिनिधींशी झालेल्या गैरवर्तनाची तत्काळ व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. संविधानाने दिलेल्या अधिकारांचा व लोकप्रतिनिधींच्या सन्मानाचा आदर राखला जावा. निवडणूक आयोगाच्या कामकाजात केंद्र सरकारने पारदर्शकता आणावी. देशातील निवडणूक व्यवस्थेची विश्वासार्हता अबाधित राखण्यासाठी संवैधानिक संस्थांनी स्वतंत्र व दबावमुक्तपणे काम करावे. आदी विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.या निषेध आंदोलनात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. जे. पी. बोरसे, जिल्हा आदिवासी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक अहिरे, परीक्षित देशमुख, देविदास भदाणे, उदय पाटील, जिल्हा सरचिटणीस प्रवीण कोळी, जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद सिसोदे, यूथ काँग्रेसचे विनोद पाटील, पंकज निकम, शहराध्यक्ष गजेंद्र भामरे, उपाध्यक्ष अजय तमखाने, आनंद कसबे, महेद्र मालचे, श्याम महाले, रमेश महाले, मोहन सोनवणे, गजानन पाटील, सुनील गागरे आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
![]()
