सत्यध्येय एकविचार उपसंपादक योगिता जोशी कल्याण :
कल्याणमधील वालधुनी परिसरात अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या दोन स्वतंत्र घटना उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या दोन्ही प्रकरणांत महात्मा फुले पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या घटनेत ९ वर्षीय मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली गुड्डू शेख याला अटक करण्यात आली आहे. तर दुसऱ्या घटनेत ४ वर्षीय चिमुकलीवरील लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली रामजीवन यादव याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.दोन्ही प्रकरणांचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांकडून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. आरोपींना न्यायालयात हजर करण्याची तयारी असल्याची माहिती मिळाली आहे.
चिमुकल्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
अत्यंत लहान वयाच्या मुलींशी संबंधित या घटनांमुळे बालसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशा प्रकरणांत निष्पक्ष तपास, पीडित बालिकांचे संरक्षण आणि कायद्यानुसार कठोर कारवाई होणे महत्त्वाचे आहे.
![]()
