सत्यध्येय एकविचार उपसंपादक योगिता जोशी कल्याण :
कल्याण तालुक्यातील खडवली परिसरात दोन व्यक्तींच्या एकूण १२ बकऱ्या चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी टिटवाळा पोलिसांनी वसीम शेख याला अटक केली असून, त्याच्याकडून चोरीला गेलेल्या बकऱ्यांपैकी चार बकऱ्या हस्तगत करण्यात यश आले आहे. मात्र, उर्वरित आठ बकऱ्यांचा शोध अद्याप सुरू असून, या गुन्ह्यातील दुसरा संशयित आरोपी फरार आहे.मिळालेल्या माहितीनुसार, खडवली परिसरातून दोन व्यक्तींच्या बारा बकऱ्या चोरीला गेल्यानंतर टिटवाळा पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान वसीम शेख याला अटक करून चार बकऱ्या हस्तगत करण्यात आल्या. आता उर्वरित बकऱ्यांचा शोध घेण्यासह फरार आरोपीचा माग काढण्याचे काम पोलीस करत आहेत. या घटनेमुळे परिसरातील पशुधनाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास टिटवाळा पोलीस करत आहेत.
![]()
