डोंबिवली (पूर्व) येथे मानवाधिकार न्याय जनसेवा ट्रस्ट च्या ६ व्या वर्धापन दिनानिमित्त नवीन कार्यालयाचे उद्घाटन रविवार, दिनांक १० मे २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता करण्यात येणार आहे. याच निमित्ताने आरोग्य तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले असून संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिनेश रमाशंकर गुप्ता यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रमही साजरा करण्यात येणार आहे.
संस्थेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, कार्यक्रमात नवीन कार्यालयाचे विधिवत उद्घाटन करण्यात येईल. तसेच सहा वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर संस्थेच्या सामाजिक, कायदेशीर व जनसेवा क्षेत्रातील विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली जाणार आहे. या कार्यक्रमास सामाजिक क्षेत्रातील नागरिक, पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
अलीकडेच संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिनेश रमाशंकर गुप्ता व पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष (माजी कॅबिनेट मंत्री) व डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्या निवासस्थानी भेट देऊन १० मे रोजी होणाऱ्या उद्घाटन व वर्धापन दिन सोहळ्याचे निमंत्रण दिले. यावेळी सामाजिक व जनहिताच्या विविध विषयांवर चर्चा देखील करण्यात आली.
या कार्यक्रमाला राष्ट्रीय मुख्य विधी सल्लागार ॲड. सुनील गायकवाड, राष्ट्रीय मुख्य सल्लागार नरेंद्र पवार, राष्ट्रीय वरिष्ठ सचिव सर्वन बिंदयाचल गुप्ता यांच्यासह संस्थेचे अनेक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
आयोजन समितीत राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. आशिष व्ही. परमाल, राष्ट्रीय प्रभारी विश्वास यादव, राष्ट्रीय महिला सल्लागार व नगरसेविका शोभाताई जाधव, राष्ट्रीय वरिष्ठ प्रवक्ते कृष्ण शरण सिंह, राष्ट्रीय महासचिव दिनेश कुमार यादव, राष्ट्रीय संघटन प्रभारी उमेश गावडे, राष्ट्रीय कोषाध्यक्ष डॉ. जितेंद्र एस. गुप्ता, राष्ट्रीय युवा विधी सल्लागार ॲड. जयेश चांदेकर, विधी सल्लागार मोहन जी. क्षीरसागर, राष्ट्रीय वरिष्ठ सल्लागार विश्वनाथ डामरे, राष्ट्रीय वरिष्ठ विधी सल्लागार सी.ए. नितेश प्रताप सिंग तसेच राष्ट्रीय प्रवक्ते कचरू वेळंजकर यांचा समावेश आहे.
संस्थेने नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व शुभचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन केले आहे.
![]()
