संगमनेर | प्रतिनिधी
संगमनेर शहरात आयोजित करण्यात आलेल्या इंदोरीकर महाराज यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यात धक्कादायक चैनस्नॅचिंगची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली होती. ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांच्या गळ्यातील तब्बल ६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने बळजबरीने चोरून नेल्याची घटना समोर आली होती. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ३६२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गंभीर घटनेचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांच्या पथकाने अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करत आरोपींचा माग काढला. तांत्रिक माहिती, गुप्त बातमीदार व व्यावसायिक कौशल्याच्या आधारे सदर गुन्हा हा रेकॉर्डवरील आरोपी सागर सुरेश कांबळे याने आपल्या साथीदारांसह केल्याची माहिती पोलिसांना मिळाली.त्यानुसार आरोपी चोरी केलेल्या सोन्याची वाटणी करण्यासाठी मोटारसायकलवरून ममदापूर फाटा येथे येणार असल्याची खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच पथकाने तात्काळ सापळा रचला. पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी आपली नावे१) सागर सुरेश कांबळे (वय ३२, रा. रामनगर वॉर्ड नं. १, श्रीरामपूर)२) बबलू उर्फ अब्दुल इब्राहिम पिंजारी (वय ३६, रा. वॉर्ड नं. २, श्रीरामपूर)अशी सांगितली.सखोल चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली देत आपल्या इतर साथीदारांचीही नावे उघड केली. त्यामध्ये३) आतिक आयुब उर्फ आरीफ शेख (रा. वॉर्ड नं. २, श्रीरामपूर – फरार)४) सनी विलास ढोकणे (रा. वॉर्ड नं. २, श्रीरामपूर – फरार)यांचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले.पोलिसांनी आरोपींकडून १ लाख ४९ हजार ५०० रुपये किमतीचे ११.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ७० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन तसेच ७० हजार रुपये किमतीची मोटारसायकल असा एकूण २ लाख ८९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.ताब्यात घेतलेल्या आरोपींना मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी संगमनेर शहर पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास संगमनेर शहर पोलीस करीत आहेत.
![]()
