दि. 23 मे 2026 रोजी सायंकाळी सुमारे 6.30 वाजेच्या दरम्यान शिरपूर तालुका पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाला एक अत्यंत गोपनीय माहिती प्राप्त झाली. दोन संशयित इसम हे गावठी बनावटीचे कट्टे (पिस्टल) व जिवंत काडतुसे बेकायदेशीररीत्या बाळगून उमर्टी (मध्यप्रदेश) येथून आंबे मार्गे शिरपूरकडे येत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती.सदर माहिती तात्काळ पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांना देण्यात आली. त्यांनी कोणतीही वेळ न दवडता तातडीने कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार गुन्हेशोध पथकाने खंबाळे-आंबे मार्गावर सापळा रचला.दरम्यान, आंबे गावाच्या बाहेरील दगडी बाकड्याजवळ दोन इसम संशयास्पद हालचाली करताना दिसून आले. पोलिसांची गाडी पाहताच दोघांनी घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी शिताफीने पाठलाग करून दोघांनाही ताब्यात घेतले.चौकशीदरम्यान आरोपींनी आपली नावेविकास उर्फ पल्लुराम मनोज घारू (वय 30, रा. बाजीराव नगर, येवला, जि. नाशिक)रावसाहेब अशोक मोरे (वय 29, रा. निमगाव, ता. येवला, जि. नाशिक)अशी सांगितली.दोघांची पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता पोलिसांच्या हाती मोठा शस्त्रसाठा लागला. आरोपींकडून 03 गावठी बनावटीचे कट्टे (पिस्टल), 06 जिवंत काडतुसे आणि 02 अतिरिक्त मॅगझीन असा तब्बल 1 लाख 6 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.03 गावठी बनावटीचे कट्टे (पिस्टल)06 जिवंत 7.65 एम.एम. काडतुसे 02 अतिरिक्त मॅगझीन एकूण मुद्देमाल किंमत : ₹1,06,000/- या प्रकरणी पोहेकॉ विजय ढिवरे यांच्या फिर्यादीवरून शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं. 167/2026 अन्वये आर्म ॲक्ट 3/25 तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) सह 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.या गुन्ह्याचा पुढील तपास पोसई मनोज कचरे हे करीत आहेत.ही कारवाई मा. श्री. विशाल आनंद (पोलीस अधीक्षक, धुळे), श्री. अजय देवरे (अपर पोलीस अधीक्षक, धुळे) तसेच श्री. विश्वजीत जाधव (उपविभागीय पोलीस अधिकारी, शिरपूर) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.या कारवाईत पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी, पोसई मनोज कचरे, पोहेकॉ संतोष पाटील, पोहेकॉ संदीप ठाकरे, पोहेकॉ राजू ढिसले, पोकॉ योगेश मोरे, पोकॉ विजय ढिवरे, पोकॉ स्वप्निल बांगर, चाअसई अल्ताफ मिर्झा आणि चापोकॉ इसरार फारुकी यांनी सहभाग घेतला.
![]()
