सत्यध्येय एकविचार
मुक्ताईनगर तालुका प्रतिनिधी :- आकाश बेलदार
प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार व महिला नियंत्रण संघटना, मुक्ताईनगर शाखेतर्फे मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांचा गौरव प्रमाणपत्र, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान करण्यात आला.जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या विशेष ‘ऑपरेशन ड्रॉप केस’ मोहिमेत मुक्ताईनगर पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली. या मोहिमेदरम्यान कुऱ्हा, लालगोटा, हलखेडा, माधापुरी, जोधनखेडा आणि चारठाणा या गावांमध्ये धाडसत्र राबविण्यात आले.या कारवाईत मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम, सोने-चांदीचे दागिने, शस्त्रे, जिवंत काडतुसे, मोबाईल फोन, चारचाकी व दुचाकी वाहने तसेच वन्य प्राण्यांचे कातडे जप्त करण्यात आले. एकूण ₹58 लाख 42 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याने या कारवाईची जिल्हाभर दखल घेण्यात आली.या उल्लेखनीय आणि धाडसी कामगिरीबद्दल प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार व महिला नियंत्रण संघटना, मुक्ताईनगर शाखेतर्फे पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांचा गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष मोहन मेढे, जिल्हा संघटक मोतीलाल जोगी, तालुकाध्यक्ष हकीम चौधरी, तालुका सचिव विजय खराटे, तालुका उपाध्यक्ष राजेंद्र वानखेडे, जिल्हा सदस्य बी. डी. गवई, समाधान पाटील, माजी गटविकास अधिकारी राजेशकुमार जैन, सुपडू बोदडे, जगदेव इंगळे, धनंजय सापधरे, सौ. भारती लोखंडे, रविंद्र शिरसोदे, इंद्रियानी भोई, जगन्नाथ चांगदेवकर, दिनेश कोळी, भास्कर कोळी, जे. के. चौधरी यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
![]()
