सत्यध्येय एकविचार शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी :-
जनसेवा सप्ताहाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते स्व. अजितदादा पवार यांच्या ६७ व्या जयंती निमित्त शिंदखेडा येथील बिजासनी मंगल कार्यालयात ‘स्व. अजितदादा पवार जीवन गौरव पुरस्कार’ वितरण सोहळा अत्यंत उत्साहात आणि भव्य दिव्य वातावरणात पार पडला.सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार रामकृष्ण तात्या पाटील हे होते. तर हा पुरस्कार वितरण सोहळा माजी मंत्री तथा विद्यमान आमदार अनिल दादा पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सन्मान
या सोहळ्यात शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंत व्यक्तींना ‘स्व. अजितदादा पवार जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. शाल, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन या सर्व मान्यवरांचा गौरव करण्यात आला.यामध्ये प्रामुख्याने राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कृषी, उद्योग, आरोग्य, कला, सहकार, महिला बचत गट आणि पत्रकारिता या क्षेत्रांतील व्यक्तींसह सरपंच, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील व कोतवाल यांचा समावेश होता.कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) प्रवक्ते शामकांत सनेर यांनी केले. याप्रसंगी माजी आमदार प्रा. शरद पाटील आणि म्हाडाचे माजी सभापती किरण शिंदे यांनी आपल्या मनोगतातून स्व. अजितदादा पवार यांच्या जीवनकार्याला उजाळा दिला आणि त्यांच्या कार्याचा गौरव केला.हा पुरस्कार सोहळा केवळ सन्मानाचा नव्हता तर समाज कार्यात सातत्याने कार्य करणारे प्रत्येक व्यक्तीला प्रेरणा देणारा आणि स्व. अजित दादा पवार यांच्या जनकल्याणाच्या विचाराना पुढे नेण्याचा दृढ संकल्प करणारा ठरला. मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पुढील मान्यवर उपस्थित होते: शामकांत सनेर (प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – अजित पवार गट) , प्रा. शरद पाटील (माजी आमदार, धुळे ग्रामीण) ,किरण शिंदे (माजी सभापती, म्हाडा) ,कलावती माळी (नगराध्यक्षा) ,भाऊसाहेब कामराज निकम (माजी उपाध्यक्ष, धुळे जिल्हा परिषद),संजीवनी गागुर्डे (महिला जिल्हाध्यक्ष),प्रकाश पाटील (माजी संचालक, डी.डी.सी. बँक),राजेंद्र देवरे (माजी पंचायत समिती सदस्य),दिपक जगताप (तालुकाध्यक्ष, शिंदखेडा),नंदू भाऊसाहेब पाटील (जिल्हाध्यक्ष, किसान सेल),गोलू देसले (शहराध्यक्ष), स्वाती बच्छाव, हेमांगी सनेर,महेंद्र शिरसाठ, राजु देवरे याशिवाय नगरसेविका रजुबाई सुभाष माळी, सुनीता अरुण देसले, कमलताई रविंद्र पाटोळे, तसेच अरुण देसले, राहुल पाटोळे, सुभाष माळी, नगरसेवक प्रा. दिपक माळी, अर्जुन भिल, राहुल पाटील,रामभाऊ माणिक,रामसिंग गिरासे, हेमराज पाटील, मोतीलाल पाटील, सोनु झालसे, डॉ. नितीन चौधरी आदी पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.उत्कृष्ट नियोजन आणि हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती यावेळी होती.या भव्य सोहळ्याचे आयोजन महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते शामकांत सनेर यांनी केले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिंदखेडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. स्व. अजितदादा पवार यांच्यावर प्रेम करणारे सर्व क्षेत्रांतील हजारो कार्यकर्ते व नागरिक या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित होते.
![]()
