सत्यध्येय एकविचार शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी :-
नरडाणा येथील ग्रामीण विकास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कै. म.दि. सिसोदे उर्फ भाऊसाहेब कला, वाणिज्य व डॉ. उषाताई प्रसादराव तनपुरे विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय तसेच श्रीमती आर. एम. सिसोदे कनिष्ठ महाविद्यालयात गुणवत्ता निर्धारण कक्ष (IQAC) आणि राष्ट्रीय सेवा योजना (NSS) यांच्या संयुक्त विद्यमाने गुरु पौर्णिमा अत्यंत उत्साहपूर्ण व मंगळमय वातावरणात साजरी करण्यात आली.
महर्षी वेदव्यास यांच्या प्रतिमेचे पूजन
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एस. गिरासे यांच्या शुभहस्ते महाभारताची रचना करणारे आद्यगुरू महर्षी वेदव्यास यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला व विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. यू. जी. पाटील आणि प्रा. एस. टी. भामरे यांच्यासह वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्राचार्य डॉ. पी. एस. गिरासे यांचे मार्गदर्शनविद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. पी. एस. गिरासे यांनी महर्षी वेदव्यास यांच्या जीवनकार्यावर सविस्तर प्रकाश टाकला. ते म्हणाले,
“आषाढ महिन्यातील ‘गुरु पौर्णिमा’ म्हणजेच व्यास पौर्णिमा हा आपल्या संस्कृतीतील अत्यंत पवित्र सण आहे. मानवाच्या सर्वांगीण विकासात आणि योग्य दिशा दाखवण्यात गुरूंचे स्थान अनन्यसाधारण असते. सर्वांच्या आयुष्यात गुरूंचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद नेहमीच प्रकाशाचा मार्ग दाखवत राहो,” असे सांगत त्यांनी उपस्थितांना गुरु पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा संकल्प
या कार्यक्रमादरम्यान पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पवित्र स्मृतींना आदरांजली वाहण्यात आली. त्यांच्या दातृत्व, कार्यकुशलता आणि सामाजिक विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा दृढ संकल्प या वेळी प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. राहुल भदाणे, प्रा. डॉ. यू. एस. पाटील, प्रा. गिरीष पवार तसेच आर. ओ. पाटील, डी. व्ही. बोरसे, संदीप निकम, प्रशांत सिसोदे, संजय बोरसे, शैलेंद्र सिसोदे, शंकर सिसोदे आणि शशीकांत भामरे यांनी विशेष परिश्रम घेतले. समारंभ उत्साहात पार पडला असून उपस्थित विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांप्रती आदराची व कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.
![]()
