सत्यध्येय एकविचार धुळे प्रतिनिधी:
हिरे मेडिकल कॉलेजच्या आवारातून चोरीस गेलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा धुळे शहर पोलिसांनी छडा लावला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी मालेगाव येथे कारवाई करून दोन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीस गेलेली सुमारे २० हजार रुपये किमतीची बजाज प्लॅटिना मोटारसायकल हस्तगत करण्यात आली आहे.दि. ८ ऑगस्ट २०२६ रोजी हिरे मेडिकल कॉलेज, धुळे येथील आवारातून फिर्यादी गजानन प्रकाश सोनवणे यांची बजाज प्लॅटिना 100 CC मोटारसायकल क्रमांक MH-18/BK-4383 अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गु.र. नं. 343/2026, BNS कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे शहर पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने सुरू केला. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांचे पथक मालेगाव, जि. नाशिक येथे रवाना झाले. तेथे कारवाई करत मसूद अहमद मुशीर अहमद अन्सारी (वय ३०, रा. देविका मळा, मालेगाव) आणि सुलतान अहमद हयातुल्ला (वय २८, रा. देविका मळा, आदमनगर, मालेगाव) या दोघांना ताब्यात घेण्यात आले.पोलिसांच्या माहितीनुसार, दोन्ही आरोपींनी संबंधित मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेली बजाज प्लॅटिना मोटारसायकल, किंमत २० हजार रुपये, हस्तगत करण्यात आली.या कारवाईमुळे हिरे मेडिकल कॉलेज आवारातील दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा छडा लागला असून, आरोपींकडून आणखी काही चोरीचे गुन्हे उघडकीस येतात का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. आरोपींविरुद्ध कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद व अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
![]()
