सत्यध्येय एकविचार
धुळे, दि. १३ ऑगस्ट २०२६ : नागरिकांना सुरक्षित, गुणवत्तापूर्ण व भेसळमुक्त अन्न उपलब्ध करून देण्यासाठी “सुरक्षित अन्न – निरोगी महाराष्ट्र” मोहिमेअंतर्गत धुळे जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासन विभागाने विविध अन्न आस्थापनांची तपासणी करून अन्नपदार्थांचे नमुने संकलित केले. मा. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार ही मोहीम राबविण्यात आली.या मोहिमेत केशवस्मृती आदिवासी आश्रमशाळा, कुसुंबा येथे तपासणी करून मसाले पदार्थ, खाद्यतेल, तांदूळ व सोयाबीन वडी आदी अन्नपदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. त्यानंतर ज्युबिलंट फूड (Domino’s), बस स्टँडजवळ, देवपूर येथे तपासणी करण्यात आली. यावेळी चिकन सॉसेज, पनीर, खाद्यतेल आदी अन्नपदार्थांचे एकूण ५ नमुने संकलित करण्यात आले. याच परिसरातील बेल्जियम वॉफेल या आस्थापनाचीही तपासणी करण्यात आली.दरम्यान, साक्री तालुका एज्युकेशन सोसायटी, साक्री आश्रमशाळा येथेही तपासणी करण्यात आली. तेथून खाद्यतेल व मसाले पदार्थांचे एकूण ५ नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. अशाप्रकारे विविध ठिकाणी अन्नपदार्थांची गुणवत्ता, सुरक्षितता व स्वच्छतेच्या अनुषंगाने तपासणी करून नमुना संकलन करण्यात आले.संकलित नमुने अधिकृत प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार असून, प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत अंतिम निष्कर्ष स्पष्ट होणार आहे. विश्लेषण अहवालात अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन अथवा नियमभंग आढळल्यास संबंधितांविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके अधिनियमातील तरतुदींनुसार पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे.ही कारवाई सह आयुक्त (अन्न), नाशिक मंगेश माने व सहायक आयुक्त (अन्न), धुळे गोपाल माहोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आनंद पवार, सुवर्णा महाजन, अन्न सुरक्षा अधिकारी, अरविंद राऊत व मंगेश भावसार यांनी केली.नागरिकांना सुरक्षित, गुणवत्तापूर्ण व भेसळमुक्त अन्न मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडून अशा प्रकारच्या तपासण्या व नमुना संकलनाची मोहीम यापुढेही सातत्याने सुरू राहणार आहे.
![]()
