सत्यध्येय एकविचार शिरपूर प्रतिनिधी :
शिरपूर एज्युकेशन संचलित आर.सी.पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निकच्या प्रथम वर्ष बी.टेक चा विद्यार्थी यशोदीप पालीवाल याने धुळे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व सकाळ समुहाच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘यीन’ अधिवेशनात केले,सदर अधिवेशन विधानभवन,मुंबई येथे दिनांक ३० मार्च ते १ एप्रिल २०२६ दरम्यान घेण्यात आले होते,संपूर्ण महाराष्ट्र भरातून २८८ तरुणांचा सहभागी झाले होते,या ‘यीन’अधिवेशनाला महाराष्ट्र राज्याच्या मंत्रीमंडळातील शालेय शिक्षण मंत्री मा.दादाजी भुसे,उच्च तंत्रशिक्षण मंत्री तथा संसदीय कार्यमंत्री महाराष्ट्र राज्य मा.चंद्रकांतजी पाटील,विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे,महाराष्ट्र राज्य जलसंपदा मंत्री गिरीशजी,महाजन,महाराष्ट्र राज्य उद्योगमंत्री उदय सामंत,ग्रामीण गृहमंत्री मा.पंकज भोयर,शहरी गृहमंत्री मा.योगेश कदम,उद्योजक अशोक खाडे, के. जे. एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या संचालिका हर्षदा जाधव,महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, फ्रेंड्स युनियन फॉर एंनरजायझिंग लाईव्हज’ चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. केतन देशपांडे आदी मान्यवरांनी संबोधित करत,अमूल्य असं मार्गदर्शन सहभागी झालेल्या तरुणांना केलं,यीन च्या माध्यमातून राजकारणाबद्दल सकारात्मकता वाढविणे,देशात अभ्यासू व दिशा देणारं नेतृत्व तयार करणं,त्याचबरोबर युवकांना लोकशाही समजावी,सामाजिक, शैक्षणिक,राजकीय कर्तव्य लक्षात यावी,युवकांना विविध क्षेत्रात योगदान देता येईल,विकासाबाबत जागृत असा तरुण तयार होईल,या संदर्भात ‘यीन’अधिवेशनाच्या माध्यमातून युवकांना प्रेरित करण्यात आले, त्याचबरोबर सभागृहाचे कामकाज, मंत्रीमंडळातील भूमिका याविषयी मार्गदर्शन करण्यात आले, सदर अधिवेशन यशवंतराव चव्हाण सभागृह व विधानभवन (मुबंई ) येथे पार पडले, ह्या ‘यीन’ अधिवेशन ह्या उपक्रमांतर्गत धुळे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी आपल्या महाविद्यालयातील यशोदीप पालीवाल याची निवड करण्यात आली,या निवडीबद्दल,संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री आ.अमरिशभाई पटेल,कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल,उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी,उद्योगपती तथा शिरपूर वरवाडे नगर परिषदेचे नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल,सचिव रेशा पटेल,कॉलेजचे प्राचार्य डॉ. नवीन हासवाणी यांनी अभिनंदन केले.
![]()
