सॉफ्टबॉल असोसिएशन धुळे जिल्हयाची खेळाडू शिरपूर तालुक्यातील उदयोन्मुख खेळाडू कुमारी प्रजिता कैलास कंखरे हिची शालेय शासकीय 14 वर्ष खालील मुलींच्या राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी निवड झाली होती त्यात दिल्ली येथे होणाऱ्या 69 व्या शालेय राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेत कांस्यपदक पटकविले.
धुळे येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेत प्रजिता ने उत्कृष्ठ खेळाचे प्रदर्शन करीत राष्ट्रीय निवड चाचणी साठी राजस्थान मधील जोधपूर येथे जानेवारी महिन्यात झालेल्या निवडचाचणीत विविध राज्यातून असंख्य खेळाडू सहभागी झाले होते. त्यातून दिल्ली येथे होणा-या स्पर्धेसाठी तिची उल्लेखनिय कामगीर पाहता निवड करण्यात आली होती
69 व्या शालेय राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धा दिनांक 15 ते 22 एप्रिल 2026 दिल्ली येथे कुमारी प्रजिता कैलास कंखरे स्पर्धेत धुळे जिल्हयातून निवड झालेली एकमेव खेळाडू आहे. साखळी स्पर्धेत गुजरात, पंजाब, तामिळनाडू यांचा पराभव करत बाद पध्दतीत जम्मु काश्मिर संघाचा पराभव करता उपउपात्य फेरीत आध्र प्रदेश सोबत विजय मिळवित उपांत्य फेरीत दिल्ली सोबत पराभवाचा सामना करावा लागला त्यात तृतीय क्रमांक साठी मध्यप्रदेश सोबत विजय मिळवित राष्ट्रीय स्पर्धेचे कांस्यपदक प्राप्त केले.
कुमारी प्रजिता कैलास कंखरे ही 8 वी इत्तेत शिकत असून ती धुळे जिल्हयाची पदक प्राप्त पहिली खेळाडू ठरली आहे. तिच्या या यशामुळे जिल्हयातील क्रीडा क्षेत्रातील गौरव वाढला आहे तीच्या या उल्लेखनिय यशाबददल सॉफ्टबॉल असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष मा.ना.गिरीषभाऊ महाजन सरचिटणीस प्रदिपजी तळवेलकर, राष्टीय प्रशिक्षक किशोर चौधरी तसेच सॉफ्टबॉल असोसिएशनचे धुळे जिल्हा अध्यक्ष मा.ना.जयकुमार भाऊ रावल तसेच उपाध्यक्ष सतिष तात्या महाले कार्याध्यक्ष राहुलभाऊ रंधे व मनोजभाऊ धनगर, जिल्हा क्रीडा अधिकारी एम.के.पाटील सर, रेखा पाटील, योगेश देवरे, शुभाप पावरा, प्राध्यापक प्रताळे, निंबाजी राठोड, ठाकूरसर, अमोल अहिरे, प्रयिंका सुलाखे, अशोक महाजन, ॲड श्याम पाटील, धुळे जिल्हा प्रशिक्षक राजेश मोरे, अनिल वाडीले, ओम धनगर, अश्विन देवरे, विशाल पवार तसेच धुळे जिल्हा भरातून विविध स्तरावरून कर्मचारी क्रीडा प्रशिक्षक, यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या प्रजिताच्या या यशामुळे जिल्हाभरात क्रीडाक्षेत्रात आनंदाचे वातावरण असून भविष्यात ती आंतराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनिय कामगिरी करेल अशी सर्वाना आशा आहे .
![]()
