सत्यध्येय एकविचार शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी :-
तालुक्यातील नागरिक, विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी आणि नियमित रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी शिंदखेडा रेल्वे स्थानकावर आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे तसेच विविध महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांना थांबा देण्याबाबत धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. शोभाताई बच्छाव यांना शिंदखेडा तालुक्याच्या वतीने सविस्तर निवेदन देण्यात आले आहे. तालुका काँग्रेस अध्यक्ष तथा नगरपंचायतचे विरोधी पक्षनेते सुनील भाऊ चौधरी यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले.शिंदखेडा रेल्वे स्थानक हे या भागातील महत्त्वाचे वाहतुकीचे केंद्र असून, येथे अनेक मूलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करून तातडीने प्रश्न सोडवण्याची मागणी करण्यात आली आहे.
१. रेल्वे स्थानकावरील मूलभूत सुविधा:
प्लॅटफॉर्मवर कोच पोझिशन डिस्प्ले बोर्ड बसवण्यात यावा. रेल्वेगाड्यांच्या आगमन व प्रस्थानाची माहिती देण्यासाठी डिजिटल डिस्प्ले बोर्ड बसवावेत. प्रवाशांसाठी फिल्टर केलेल्या शुद्ध पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी.रेल्वे स्थानकावर आर.पी.एफ. (रेल्वे सुरक्षा दल) चौकी किंवा स्टाफ उपलब्ध करून देण्यात यावा.प्रवाशांच्या सोयीसाठी यूटीएस (UTS) जनरल तिकिटांचे दोन काउंटर सुरू करण्यात यावेत.भडणे रेल्वे ओव्हरब्रिजवरील बंद असलेली प्रकाशव्यवस्था (लाईट्स) तातडीने पूर्ववत सुरू करावी.
२. महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांना थांबे देण्याची मागणी:
प्रेरणा एक्सप्रेस (गाडी क्र. २२१३७/२२१३८)
बरोनी एक्सप्रेस (गाडी क्र. १९४८३/१९४८४)
भागलपूर एक्सप्रेस (गाडी क्र. २२९४७/२२९४८)
भुसावळ–नंदुरबार गाडी (क्र. ५९०७५/५९०७६) सुरतपर्यंत विस्तारित करण्यात यावी.उधना–पुणे अमृत भारत एक्सप्रेस सुरू करून तिला शिंदखेडा येथे थांबा देण्यात यावा.
गाडी क्र. १९१०५/१९१०६ च्या वेळापत्रकात प्रवाशांच्या सोयीनुसार बदल करावा.अमरावती एक्सप्रेस (गाडी क्र. २०९२५/२०९२६) दररोज चालविण्यात यावी.खान्देश एक्सप्रेसला (गाडी क्र. १९००३/१९००४) आधुनिक एलएचबी (LHB) कोच जोडण्यात यावेत.ज्येष्ठ नागरिकांसाठी पूर्ववत ५०% रेल्वे तिकीट सवलतीचा कोटा पुन्हा सुरू करण्यात यावा.मिळालेल्या माहितीनुसार, लवकरच मुंबई येथे डीएम साहेबांकडे खासदार डॉ. शोभाताई बच्छाव यांची महत्त्वाची बैठक होणार असून, त्या ठिकाणी शिंदखेडा रेल्वे स्थानकाच्या विकासाचे हे सर्व ज्वलंत विषय ताईंकडून रेल्वे प्रशासनासमोर मांडले जाणार आहेत. यामुळे शिंदखेड्यातील प्रवाशांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.हे निवेदन देताना जिल्हाध्यक्ष युवराज कारनकाळ, तालुकाध्यक्ष सुनील चौधरी, दीपक अहिरे, राहुल पाटोळे, परीक्षेत देशमुख, शब्बीर पठाण, संतोष देसले, डॉ. दिनेश बच्छाव यांसह तालुक्यातील अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
![]()
