सत्यध्येय एकविचार शिंदखेडा यादवराव सावंत (प्रतिनिधी):
तालुक्यात निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि त्यांना तातडीने न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या वतीने शिंदखेडा मध्यवर्ती कार्यालयात महाराष्टात पहिले ‘शेतकरी मदत केंद्र’ सुरू करण्यात आले आहे. या केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अडचणी प्रत्यक्ष जाणून घेऊन संबंधित प्रशासनाकडे त्यांचा प्रभावी पाठपुरावा केला जाणार आहे. दुष्काळग्रस्त परिस्थितीचा सातत्यपूर्ण पाठपुरावाशिंदखेडा तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीबाबत सातत्याने आवाज उठवत, तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यासाठी शिवसेनेने मोठा पाठपुरावा केला होता. याच प्रयत्नांमुळे तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश झाल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.मात्र, केवळ कागदोपत्री यादीत नाव समाविष्ट झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी संपत नाहीत. दुष्काळाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीचा जास्तीत जास्त व प्रत्यक्षात लाभ मिळवून देणे आवश्यक असल्याची ठाम भूमिका शिवसेना जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी यावेळी व्यक्त केली. कागदी नियम, प्रक्रियेतील अडथळे आणि केवळ घोषणांमध्ये शेतकरी अडकून न राहता त्यांना प्रत्यक्ष मदत पोहोचवण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने कार्यवाही करावी, अशी आक्रमक भूमिकाही पक्षाने घेतली आहे.मदत केंद्राद्वारे सोडवले जाणारे महत्त्वाचे प्रश्न शेतकरी मदत केंद्रामध्ये शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित व दैनंदिन समस्यांवर मार्गदर्शन व पाठपुरावा केला जाईल, ज्यामध्ये प्रामुख्याने खालील विषयांचा समावेश आहे:पीक विमा, अतिवृष्टी/दुष्काळामुळे झालेला नुकसान व पंचनामे.शासनाकडून मिळणारी मदत, पीक कर्ज, कर्जमाफी आणि कर्जवसुलीचे प्रश्न.खते-बियाण्यांचा तुटवडा, कृषी पंपांची वीज समस्या आणि सिंचन योजना.शेतमालाचे बाजारभाव, ७/१२ उतारे, फेरफार नोंदी आणि इतर महसूलविषयक प्रश्न.येथे शेतकऱ्यांची तक्रार केवळ स्वीकारून न ठेवता, आवश्यकतेनुसार संबंधित विभाग व अधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन त्याचा पाठपुरावा केला जाणार आहे.”शेतकऱ्यांना एकटे सोडणार नाही” – शानाभाऊ सोनवणेशेतकऱ्यांच्या अडीअडचणीच्या काळात त्यांना कधीही एकटे सोडले जाणार नाही. शेतकऱ्यांना कुठलीही समस्या उद्भवल्यास शिवसेनेचे हे शेतकरी मदत केंद्र अखंडपणे सुरू राहील, अशी ठाम ग्वाही जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी दिली. “समस्या शेतकऱ्याची असो, प्रश्न कोणत्याही विभागाचा असो; शेतकऱ्याला योग्य मार्गदर्शन आणि प्रशासनाकडे त्याचा पाठपुरावा मिळवून देणे हेच या केंद्राचे प्रमुख उद्दिष्ट आहे,” अशी प्रतिज्ञा पक्षाने केली आहे.”समस्या तुमची — पाठपुरावा आमचा”या ब्रीदवाक्याखाली हे मदत केंद्र कार्यरत राहणार आहे.याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, उपजिल्हाप्रमुख छोटु पाटील, सर्जेराव पाटील, तालुकाध्यक्ष गिरीष देसले, शहरप्रमुख नंदकिशोर पाटील, उपशहरप्रमुख मनोहर राजपुत, मनोज पवार, एस. डी. पाटील, बन्सीलाल माळी, संतोष माळी, तालुका युवा अधिकारी रावसाहेब ईशी, साबिर पटेल, डॉ. मनोज पाटील,आधार बोरसे,शकील पटेल, राकेश कुवर, रविंद्र भिल, ईश्वर देसले, धनगर नाना यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आमचा संघर्ष अखंड सुरू राहील!”
![]()
