शिरपूर : महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या सुगंधित पानमसाला व तंबाखूची विक्री करण्याच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या आयशर वाहनावर शिरपूर तालुका पोलिसांनी हाडाखेड सीमा तपासणी नाक्यावर कारवाई केली. या कारवाईत प्रतिबंधित पानमसाला व तंबाखूसह आयशर वाहन असा एकूण २९ लाख १९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पोलीस अधीक्षक श्री. विशाल आनंद यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली प्रतिबंधित गुटखा, सुगंधित पानमसाला, तंबाखू व सुपारीची अवैध वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याच्या अनुषंगाने शिरपूर तालुका पोलिसांनी ही कारवाई केली.दि. २६ सप्टेंबर २०२६ रोजी पोलीस निरीक्षक श्री. जयपाल हिरे, प्रभारी अधिकारी, शिरपूर तालुका पोलीस ठाणे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार हाडाखेड सीमा तपासणी नाक्यावर आयशर वाहन क्रमांक MP-07/GB-1618 ची पंच व अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन, धुळे यांच्या समक्ष तपासणी करण्यात आली.तपासणीदरम्यान वाहन चालक संजयकुमार किशोरीलाल गुप्ता (वय ५५), रा. रेती फाटक, लोहामंडी, ग्वालियर, मध्यप्रदेश याच्या ताब्यात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला सुगंधित पानमसाला व तंबाखू अवैधरित्या वाहतूक करताना आढळून आला.जप्त करण्यात आलेला मुद्देमाल
– ₹१२ लाख ५४ हजार किमतीचा राजश्री पानमसाला – ३८०० पॅकेट्स
– ₹५ लाख १० हजार किमतीचा राजश्री पानमसाला – २००० पॅकेट्स
– ₹९५ हजार किमतीची KP डबल ब्लॅक 18 तंबाखू – ३८०० पॅकेट्स
– ₹६० हजार किमतीची KP डबल ब्लॅक 18 तंबाखू – २००० पॅकेट्स
– ₹१० लाख किमतीचे आयशर चारचाकी वाहन क्रमांक MP-07/GB-1618 अशाप्रकारे ₹१९ लाख १९ हजार किमतीचा पानमसाला व तंबाखू आणि ₹१० लाख किमतीचे आयशर वाहन, असा एकूण ₹२९ लाख १९ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी श्री. शशिकांत भरत राणे, अन्न व औषध प्रशासन, धुळे यांच्या फिर्यादीवरून शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं. २६३/२०२६ अन्वये BNS कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक श्री. अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. जयपाल हिरे, पोलीस उपनिरीक्षक हेमंत खैरनार, पोलीस उपनिरीक्षक मिलिंद पवार तसेच पोलीस अंमलदार संतोष पाटील, संदीप ठाकरे, योगेश मोरे, स्वप्निल बांगर, विजय ढिवरे व सुनील पवार यांनी केली.
![]()
