सत्यध्येय एकविचार शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी :
शिंदखेडा तालुक्यातील आदिवासी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ‘भिल समाज विकास मंच महाराष्ट्र राज्य’ यांच्या वतीने आज दिनांक २८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता शिंदखेडा तहसील कार्यालयावर एक भव्य मोर्चा काढण्यात आला. संस्थापक अध्यक्ष तथा आदिवासी काँग्रेस जिल्हाध्यक्ष दीपक अहिरे यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये नरडाणा, दभाशी, तामथरे, दोंडाईचा, शहादा, नंदुरबार, धुळे यांसह संपूर्ण तालुक्यातून शेकडो आदिवासी बांधव आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.मोर्चानंतर महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल यांच्या नावे असलेले निवेदन शिंदखेड्याचे तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी स्वीकारले. या निवेदनाद्वारे खालील प्रमख मागण्यामध्ये :-
१) शिंदखेडा तालुक्यातील आदिवासी समाजाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आदिवासी विकास विभागाने लक्षांक वाढवून पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा.
२) दभाशी येथील वनजमीन आदिवासी बांधवांनी गेल्या ४० ते ४५ वर्षांपासून कसलेली आहे. सदर जमीन नियमानुसार तात्काळ संबंधित आदिवासी बांधवांच्या नावे करण्यात यावी.
३) नरडाणा गावातील नदीकाठावरील अतिक्रमित जमीन तात्काळ मोकळी करून त्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात यावे. ग्रामसेवकावर अट्रॉसिटी अक्टप्रमाणे गुन्हा दाखल करावा.
४) रंजाणे गावातील आदिवासी बांधवांच्या दफनभूमीवरील अतिक्रमण तात्काळ हटविण्यात यावे.
५) शेवाडे येथील गट क्र. २८६ मधील दौलत तानकू भिल यांनी गेल्या ४० ते ५० वर्षांपासून कसलेली जमीन नियमानुसार त्यांच्या नावे करण्यात यावी.
६) तामथरे येथील आदिवासी बांधवांच्या दफनभूमीवरील अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे.
७) शिंदखेडा नगरपंचायत हद्दीतील बंगलाभिलाटी गावठाणातील गट क्र. १२ व १५ मधील निवासी घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना नियमानुसार सातबारा उतारा उपलब्ध करून देण्यात यावा.
८) बंगलाभिलाटी येथील गट क्र. १२ व १५ मधील आदिवासी समाजासाठी आदिवासी भवनासाठी राखीव/उपलब्ध जागा आदिवासी समाजाच्या नावावर करण्यात यावी व त्याचा सातबारा तात्काळ देण्यात यावा.
९) शिंदखेडा तालुक्यातील आदिवासी बांधवांना आदिवासी विकास विभागामार्फत प्रत्येकी ₹१५,०००/- आर्थिक सहाय्य देण्यात यावे.
निवेदन दिल्यानंतर तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी वन विभाग, आदिवासी विकास विभाग, पोलीस प्रशासन आणि नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासह शिष्टमंडळासोबत तब्बल एक तास चर्चा केली व प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.दरम्यान, जर वरील मागण्यांकडे दुर्लक्ष केले गेले आणि प्रश्न सुटले नाहीत, तर येत्या १५ दिवसांत तहसील कार्यालयासमोर संपूर्ण आदिवासी बांधव व महिलांच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येईल, असा खणखणीत इशारा यावेळी देण्यात आला.या यशस्वी मोर्चामध्ये संस्थापक अध्यक्ष दीपक अहिरे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटोळे, श्रीराम (छोटू) मोरे (नरडाणा), राजेंद्र महाले (दभाशी), अशोक सोनवणे, बापू ठाकरे , सुनील सोनवणे, सुमनताई मोरे (मांडळ) ,हिराताई अहिरे,बळीराम निकुम (शहादा), अर्जून सोनवणे,वसंत वाघ, मन्साराम वळवी, रामलाल ठाकरे, अनिल ठाकरे नंदूरबार दीपक बुधा अहिरे (एरंडोल), जगदीश बागुल, एकनाथ ठाकरे, न्हानभाऊ सोनवणे, अशोक ठाकरे, चंद्रदिप अहिरे यांच्यासह शेकडो आदिवासी बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.मोर्च्यात शिंदखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पी. एस. आय. माया राजपूत,संदीप ढाकणे, गुलाब ठाकरे, अनंत पवार व पठाण दादा सह पोलीस कर्मचारीनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
![]()
