सत्यध्येय एकविचार शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी :-
यंदाच्या पावसाळ्यात अपुऱ्या पर्जन्यमानामुळे धुळे जिल्ह्यातील शेतकरी वर्ग मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. या गंभीर दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आणि शेतकरी, कष्टकऱ्यांच्या अडीअडचणी थेट जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते तथा आमदार श्री. रोहितदादा पवार हे उद्या दिनांक ३० सप्टेंबर २०२६ रोजी धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्याप्रसंगी आ. रोहित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी तथा माजी आमदार श्री. सुनील भुसारा, प्रदेश सरचिटणीस श्री. पंकज नाना बोराडे आणि पक्षाचे प्रदेश प्रवक्ते श्री. रविकांत वर्पे हे देखील उपस्थित राहून शेतकरी बांधवांच्या बांधावर जाऊन संवाद साधणार आहेत.
दौऱ्याचे नियोजन (दिनांक ३० सप्टेंबर २०२६):
नंदुरबार जिल्ह्यातून दुपारी १:०० वाजता धुळे जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर हा दौरा खालीलप्रमाणे पार पडेल:
दुपारी ०१:०० वाजता धावडे / अंजनविहीर (ता. शिंदखेडा, जि. धुळे)
दुपारी ०१:३० वाजता शेवाडे (ता. शिंदखेडा, जि. धुळे)
दुपारी ०२:१५ वाजता चिंचवार (ता. व जि. धुळे)
दुपारी ०२:४५ वाजता निमडाळे (ता. व जि. धुळे)
दुपारी ०३:१५ वाजता धुळे जिल्ह्यातून पुढे जळगाव जिल्ह्याकडे प्रस्थान.
शेतकऱ्यांच्या या दुष्काळ पाहणी दौऱ्याची माहिती धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे यांनी दिली असून, अधिकाधिक शेतकरी बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
![]()
