शिरपूर / प्रतिनिधी
शहर व परिसरात सध्या घरगुती गॅस सिलेंडरच्या वितरणाबाबत गंभीर गैरप्रकार उघडकीस येत आहेत. सामान्य नागरिकांना वेळेवर गॅस मिळत नसताना, हॉटेलसह कॅटरिंग व्यावसायिक वापरासाठी मोठ्या प्रमाणात होत आहे.स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे:“आम्ही आठवडाभर गॅससाठी वाट पाहतो, तरीही मिळत नाही. पण हॉटेल आणि कॅटरिंगवाल्यांकडे सिलेंडरची कमतरता दिसत नाही. आम्हाला जास्त पैसे देऊन घ्यावा लागतो — हा सरळ अन्याय आहे!”महिला व गृहिणींना विशेष त्रास सहन करावा लागत असून, दैनंदिन स्वयंपाकावर परिणाम होत आहे.घरगुती सिलेंडर वळवले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांना जास्तीचे पैसे मोजून सिलेंडर घ्यावे लागत आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, काही गॅस एजन्सी व दलालांच्या संगनमताने घरगुती गॅसचा वापर व्यावसायिक कारणांसाठी केला जात आहे. हे स्पष्टपणे कायद्याचे उल्लंघन होत आहे.स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून, “आम्हाला हक्काचा गॅस वेळेवर मिळत नाही, पण हॉटेलवाल्यांना सहज उपलब्ध होतो,” अशी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.घरगुती गॅसचा असा उघड गैरवापर सुरू राहिला तर सामान्य नागरिकांना भविष्यात आणखी मोठ्या टंचाईला सामोरे जावे लागेल. प्रशासनाने तात्काळ कारवाई करून हा काळाबाजार थांबवणे अत्यावश्यक आहे, अन्यथा नागरिकांचा रोष उफाळण्याची शक्यता नाकारता येत नाही.प्रशासनाने तात्काळ या प्रकाराची दखल घेऊन संबंधित गॅस एजन्सींवर छापे टाकावेत व दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
![]()
