लातूर लोकसभा मतदारसंघाचे माजी संसदरत्न खासदार, सुप्रीम कोर्टाचे ॲडव्होकेट आणि समाजकारण व न्यायव्यवस्थेतील अभ्यासू व्यक्तिमत्त्व ॲड. सुनिल बळीराम गायकवाड यांना LL.M. (Criminal Law) प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याबद्दल भव्य सत्कार करण्यात आला. राजकारण, समाजकारण आणि न्यायक्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे लातूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार ॲड. सुनिल बळीराम गायकवाड यांनी पुन्हा एकदा आपल्या कर्तृत्वाची चमक दाखवून दिली आहे. देशाच्या सर्वोच्च न्यायालयात वकिली करत असताना त्यांनी LL.M. (Criminal Law) ही पदव्युत्तर पदवी प्रथम श्रेणीत प्राप्त करून शैक्षणिक क्षेत्रातही उल्लेखनीय यश मिळवले आहे.
सार्वजनिक जीवनात अनेक जबाबदाऱ्या सांभाळत, संसदेपासून सर्वोच्च न्यायालयापर्यंतचा प्रवास यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या गायकवाड यांनी शिक्षणाची ओढ कायम ठेवत मिळवलेले हे यश तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या या अभूतपूर्व यशामुळे लातूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
याच पार्श्वभूमीवर सत्यध्येय एकविचारचे सहसंपादक श्री. दिनेश रमाशंकर गुप्ता यांनी ॲड. सुनिल बळीराम गायकवाड यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक सत्कार केला. यावेळी त्यांनी गायकवाड यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि कायदेविषयक कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
दिनेश गुप्ता यांनी आपल्या मनोगतात म्हटले की, “संसदेत जनतेचा आवाज बुलंद करणारे आणि आज सर्वोच्च न्यायालयात न्यायासाठी लढणारे ॲड. सुनिल गायकवाड यांनी प्रथम श्रेणीत LL.M. पदवी मिळवून युवकांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. शिक्षणाला वयाचे बंधन नसते, हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.”या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी देखील गायकवाड यांच्या जिद्दीचे आणि अभ्यासू वृत्तीचे कौतुक केले. सामाजिक बांधिलकी, जनसेवा, संसदीय अनुभव आणि न्यायक्षेत्रातील योगदान यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व अधिक उंचावले असून, त्यांचे हे यश अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
![]()
