ग्राहकांच्या हक्क व अधिकारांबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने ग्राहक पंचायत महाराष्ट्रतर्फे धुळे जिल्हा शाखेच्या वतीने धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्हास्तरीय एकदिवसीय ग्राहक साधक प्रबोधन शिबिराचे आयोजन करण्यात आले .सदर शिबिर सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेदरम्यान लालबागजवळील जैन भवन येथे संपन्न झाले . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे राज्याध्यक्ष डॉ. विजय लाड होते तर शिबिराचे उद्घाटन ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य सचिव अरुण वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले. हयाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून नीता देसाई (अध्यक्ष, तक्रार निवारण आयोग, धुळे), डॉ. अजय सोनवणे (नाशिक विभागीय अध्यक्ष) अॅड. सुरेंद्र सोनवणे नाशिक विभाग सचिव तसेच अॅड. जी. टी. देसले (जिल्हाध्यक्ष, धुळे) प्रा. डॉ. संजय शर्मा ( जिल्हाध्यक्ष नंदुरबार ), गुरुवक्ष जाधवाणी ( जिल्हाध्यक्ष जळगाव ) यासह मान्यवर उपस्थित होते .शिबिराचे प्रास्ताविक जिल्हा संघटक प्रा. सी. डी. डागा यांनी केले.शिबिरात अरुण वाघमारे,( संवाद समन्वयातुन ग्राहक कल्याणम ), डॉ. अजय सोनवणे ( नवीन सुधारित, ग्राहक संरक्षण अधिनियम २०१९), माजी प्राचार्य बी. एम.भामरे ( शेतकरी ग्राहक),अॅड. चंद्रकांत वेशीराव ( वीज कायदा व वीज ग्राहक ), अॅड. सुरेंद्र सोनवणे नाशिक ( माहिती अधिकार २००५ ), अॅड. चैतन्य भंडारी ( सायबर कायदा ), राजेंद्र शिंपी ( एम. आर. पी.), प्रा. राजाराम राणे ( ग्राहकांचे हक्क व कर्तव्य ),मोहनदास भामरे ( खरंच काय काय होतयं ), राजाराम कुलकर्णी सी. ए. ( आयकर कायदा ) यांचे मार्गदर्शन लाभले. आहे. तसेच अॅड. जी. टी. देसले (जिल्हाध्यक्ष, धुळे) प्रा. डॉ. संजय शर्मा ( जिल्हाध्यक्ष नंदुरबार ), गुरुवक्ष जाधवाणी ( जिल्हाध्यक्ष जळगाव ) यांनी ही आपल्या जिल्ह्यातील कार्याचा लेखाजोखा आपल्या मनोगतातुन सादर केला.ग्राहक अनुभुती कथन व प्रश्नमंजुषा कार्यक्रम घेण्यात आला. हयावेळी प्रश्नमंजुषेतुन आजच्या कार्यक्रमात पुण्य कुणी कमवले तर हयातुन जिल्हा संघटक प्रा. सी. डी. डागा यांना पंसती मिळाल्यावर त्यांचा राज्य अध्यक्ष डॉ. विजय लाड यांनी विशेष सन्मान केला.कार्यक्रमाच्या आयोजनासाठी जिल्हाध्यक्ष अॅड. जे.टी. देसले,जिल्हा संघटक प्रा. चंद्रकांत डागा,कोषाध्यक्ष राजेंद्र भंडारी, सचिव एस. एन. पाटील, उपाध्यक्ष डॉ. एन. के. वाणी, सहसंघटक पी. झेड. कुवर, सहसचिव एन. टी. गुजर,साक्री तालुकाध्यक्ष बी. एम. भामरे, शिंदखेडा तालुकाध्यक्ष प्रा. प्रदीप दीक्षित, शिरपूर तालुकाध्यक्ष राजेंद्र भंडारी, धुळे तालुकाध्यक्ष जगदीश बोरसे,धुळे शहराध्यक्ष चंद्रकांत वेशीराव,प्रा. श्रीराम महाजन, दोंडाईचा शहराध्यक्ष, डॉ. कल्प देशमुख (सोनगीर) यांचे सहकार्य लाभले.हयावेळी धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यातील ग्राहक पंचायत महाराष्ट्र चे पदाधिकारी व ग्राहक साधक मोठया संख्येने सहभागी झाले होते. सुत्रसंचलन जिल्हा सह संघटक पी. झेड. कुवर यांनी केले. शिबीराची सांगता पसायदानाने करण्यात आली.
![]()
