शिंदखेडा प्रतिनिधी :-
शिंदखेडा नगरपंचायत लोकनियुक्त नगराध्यक्षा कलावती माळी यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन वार्षिक निविदा प्रक्रियेत विरोधी गटाकडून निर्माण होणाऱ्या अडथळ्यां विषयी माहिती देताना शिंदखेडा नगरपंचायतीत बहुमताचा गैरवापर करून विकास रोखला जातोय असे नगराध्यक्षा कलावती माळी यांनी सांगितले की, सन २०२६-२७ साठीच्या वार्षिक निविदा मंजुरीसाठी स्थायी समितीच्या सभा दोन वेळा किरकोळ कारणांनी स्थगित करण्यात आल्या. विरोधी गटाने अजेंडा स्पष्ट न दिल्याचे कारण दाखवले, परंतु प्रत्यक्षात मागील अजेंड्यानुसार निविदा काढण्यात आल्या होत्या.वार्षिक निविदांमध्ये खालील प्रमुख कामांचा समावेश आहे, गरजेनुसार गटारींवर आणि अत्यावश्यक ठिकाणी ढापे बसविणे., आरोग्य व स्वच्छता विभागांतर्गत जंतुनाशके फवारणे. एलईडी पथदिवे बसविणे. मुरूम पुरवठा करणे., जलशुद्धी करणासाठी मनुष्यबळ पुरवणे. खुल्या जागा तसेच नाले साफसफाई करणे., जलशुद्धीकरणासाठी टीसीएल, तुरटी, क्लोरीन वापरणे, पाणीपुरवठा पाईपलाईन दुरुस्ती, मोटार काढणे व बसवणे., गरजेनुसार बांधकाम, गवंडी काम करणे., गटारींचे चोक अप काढणे व पाईप टाकणे. नगराध्यक्षा कलावती माळी म्हणाल्या, जलशुद्धीकरणाच्या कामात गाळ साचल्यामुळे पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करणे अत्यावश्यक आहे. या कामांसाठी चार कर्मचारी नियुक्त आहेत, परंतु त्यांचे पाच महिन्यांचे पगार अद्याप थकलेले आहेत. शहरातील गटारी दुरुस्ती, नाले साफसफाई, पाणीपुरवठा दुरुस्ती, पथदिवे बसविणे व अन्य आवश्यक कामांमध्ये विलंब होत असून, काही कामांसाठी जेसीबी, पोकलँडसारख्या मशिनरी ची गरज आहे. तथापि, वार्षिक निविदा मंजुरीत अडथळ्यांमुळे कामे वेळेत होऊ शकत नाहीत. नगराध्यक्षा व सहा नगरसेवकांच्या उपस्थितीत या समस्यांचे सविस्तर विवेचन झाले, तरी विरोधी गटाचे ११ सदस्य बहुमत असल्यामुळे स्थायी समितीच्या पाचसदस्यांवर त्यांचा प्रभाव आहे. कलावती माळी यांनी सांगितले, की लोकांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी याकामांची तत्परता अत्यंत महत्त्वाची आहे. कोण अडथळा निर्माण करत आहे, हे नीट पाहणे गरजेचे आहे. प्रशासनाला आता निविदा मंजुरीसाठी आवश्यक पावले घेणे अत्यावश्यक बनले आहे, नाहीतर पावसाळ्यापूर्वी महत्त्वाची कामे उशिरा होतील, ज्याचा थेट परिणाम नागरिकांवर होऊ शकतो.हयावेळी नगरसेवक प्रतिनिधी व गांधीगिरी फेम अरुण देसले यांनी देखील बहुमत असलेल्या भाजपाच्या विरोधी नगरसेवकांवर घानागात केला.सदर पत्रकार परिषदेत नगरसेविका सुनीता अरुण देसले , कमलताई रविंद्र पाटोळे, पुष्पाताई गोपाळराव पाटील, रजूताई सुभाष माळी, नगरसेवक अर्जुन रामसिंग भील, प्रा.दीपक माळी, माजी नगरसेवक अरुण देसले, माजी पंचायत समिती सदस्य सुभाष माळी, तसेच सागर माळी, मनीष माळी आदी उपस्थित होते.
![]()
