शिंदखेडा प्रतिनिधी :-
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सभेचे प्रांत अध्यक्ष एड. वसंतराव मनकर यांच्या नेतृत्वाखाली किसान सभेच्या संघटनात्मक बांधणीसाठी तसेच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर व्यापक चर्चा करण्याच्या उद्देशाने दिनांक 12 जून ते 15 जून 2026 दरम्यान उत्तर महाराष्ट्राचा दौरा सुरू असून त्या पार्श्वभूमीवर शिंदखेडा येथे बिजासनी मंगल कार्यालयात 14 जून रोजी दुपारी तीन वाजता कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे या दौऱ्यामध्ये शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सखोल चर्चा करून संघटना व सत्तेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न प्रभावीपणे कसे सोडवता येतील याबाबत गांभीर्याने विचार विनिमय करण्यात येणार आहे. या दौऱ्यात किसान सभेचे प्रदेश कार्याध्यक्ष अभिजीत घोरपडे, सरचिटणीस तथा उत्तर विभाग प्रमुख दत्तात्रय तळोले पाटील, प्रदेश सरचिटणीस तथा संपर्क प्रमुख डॉ. गणेश डोंगरे तसेच राज्य संघटक बबनराव तिकांडे हे प्रमुख पदाधिकारी सहभागी होणार आहेत.शिंदखेडा येथील होणाऱ्या 14 जून दुपारी तीन वाजता कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे, माजी आमदार रामकृष्ण पाटील, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष भाऊसाहेब कामराज निकम, राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ता शाम सनेर,माजी आमदार शरद पाटील, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर भामरे, म्हाडाचे माजी अध्यक्ष किरण शिंदे, जिल्हा परिषद माजी सभापती किरण पाटील, शिंदखेडा नगराध्यक्षा श्रीमती कलावती सुकलाल माळी, धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा संजीवनी गांगुर्डे,माजी पंचायत समिती सदस्य डॉ. नितीन चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष दीपक जगताप सह जिल्ह्याचे सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहे तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी हजर राहावे असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिंदखेडा तालुक्याच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. दौरा यशस्वी करण्यासाठी धुळे राष्ट्रवादी काग्रेस पार्टी किसान सभा ( ग्रामीण )जिल्हाध्यक्ष नारायण चव्हाण, प्रदेश सरचिटणीस अजय भामरे, कार्याध्यक्ष मनीष देसले हे व्यवस्था पाहणार आहेत.
![]()
