विश्व हिंदू परिषद बजरंग दल गोरक्षा विभागाच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
“गोदान हेच सर्वश्रेष्ठ दान” या भारतीय संस्कृतीतील पवित्र विचाराला प्रत्यक्ष कृतीची जोड देत धुळे जिल्ह्यातील दोन शेतकरी बांधवांनी अनुकरणीय आदर्श निर्माण केला आहे. विश्व हिंदू परिषद बजरंग दल निस्वार्थी गोरक्षा धुळे जिल्हा यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पुरमेपाडा (शिवार) येथील एका शेतकऱ्याने २ देशी गायी व १ गोरे (लहान वासरू) तर बोरकुंड येथील शेतकऱ्याने १ गाय अशा एकूण ४ देशी गोवंशांचे गोदान करून त्यांना सुरक्षितपणे गोशाळेत दाखल केले.विशेष बाब म्हणजे हा गोवंश विक्रीस काढल्यानंतर कत्तलीस जाण्याची शक्यता असताना संबंधित शेतकरी बांधवांनी विश्व हिंदू परिषद बजरंग दल निस्वार्थी गोरक्षकांशी संपर्क साधला. त्यांच्या मदतीने दिनांक १३ जून रोजी सर्व गोवंश सुखरूपपणे नवकार गोशाळेत पोहोचविण्यात आला.
याहूनही कौतुकास्पद बाब म्हणजे गोवंश वाहतुकीसाठी लागणाऱ्या टेम्पोचे संपूर्ण भाडे संबंधित शेतकरी बांधवांनी स्वतः दिले. यावेळी त्यांनी भावना व्यक्त करत सांगितले की, “तुम्ही आमच्या गायींची आयुष्यभर सेवा आणि सांभाळ करणार आहात, त्यामुळे वाहतुकीचा खर्च आम्ही करणे हे आमचे कर्तव्य आहे.”
शेतकरी बांधवांच्या या गोभक्तीपूर्ण निर्णयाचे विश्व हिंदू परिषद बजरंग दल निस्वार्थी गोरक्षा धुळे जिल्हा यांच्या वतीने मनःपूर्वक स्वागत व अभिनंदन करण्यात आले आहे.
धुळे जिल्ह्यासह राज्यातील शेतकरी बांधवांना आवाहन
ज्या शेतकरी बांधवांकडे वयस्कर, दूध न देणारा किंवा सांभाळ करणे कठीण झालेला गोवंश आहे, त्यांनी कोणत्याही परिस्थितीत तो कत्तलीसाठी विकू नये. अशा गोवंशाला गोशाळेत सुरक्षित आश्रय मिळावा यासाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दल गोरक्षा विभाग सातत्याने कार्यरत असून गरजू शेतकरी बांधवांनी खालील कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क:
📞 रोहित विभांडिक – ९६६५५२२७७३
📞 मनोज चंदेल – ९७६४०२८४९०
📞 राहुल शिरसागर – ७७६८८२०१११
📞 गणेश डापसे – ७३९१८४४२५२
📞 अक्षय चौधरी – ८८५७९६८९४५
निस्वार्थी गोरक्षक, धुळे जिल्हा विश्व हिंदू परिषद बजरंग दल गोरक्षा विभाग, धुळे जिल्हा
![]()
