सत्यध्येय एकविचार
शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी :-
लोकनेते तथा माजी आमदार मंगलसिंह निमजी राजपूत ऊर्फ ठाणसिंग जिभाऊ यांच्या ३० व्या पुण्यतिथीनिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने शिंदखेडा येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी नगरपंचायत आवारात त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपस्थितांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.माजी गटनेते अनिल वानखेडे व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. तसेच वॉर्ड क्रमांक ५ मधील नगरसेविका श्रीमती अश्विनी संदीप राजपूत व जयसिंग राजपूत यांच्या परिवारातर्फे लोकनेते मंगलसिंह निमजी राजपूत ऊर्फ ठाणसिंग जिभाऊ यांची प्रतिमा शिंदखेडा नगरपंचायतीला भेट देण्यात आली. यानिमित्त नगरसेवक प्रतिनिधी संदीप राजपूत यांनी शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळांचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली.प्रसंगी संजयकुमार महाजन यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,मंगलसिंह निमजी राजपूत ऊर्फ ठाणसिंग जिभाऊ हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते व १९९५ मध्ये जनता दलाच्या तिकिटावर शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले माजी आमदार होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी शिंदखेडा शहरासाठी प्रथमतः गोबर गॅस प्लांट आणण्यासाठी त्यांचे सातत्याने प्रयत्न होते त्यासाठी त्यांनी स्वतः अभ्यास करून गोबर गॅस प्लांट चे नियोजन करण्याचा संकल्प केला होता. शिंदखेडा शहराचा विकास व्हावा शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळावे म्हणून बुराई नदीवरील वाडी शेवाडे प्रकल्प यासह तापी नदीवरील सुलवाडी बॅरेज प्रकल्प व्हावा यासाठी शासनाचे त्यांनी लक्ष वेधले होते.उत्तर महाराष्ट्रातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी तसेच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी उल्लेखनीय कार्य केले.त्यांच्या सामाजिक व राजकीय योगदानाची आठवण उपस्थितांनी यावेळी जागवली.या कार्यक्रमास उपनगराध्यक्ष उदय देसले, भाजप शहराध्यक्ष संजयकुमार महाजन, गटनेते प्रतिनिधी चेतन परमार, माजी गटनेते अनिल वानखेडे, बांधकाम सभापती मनोहर पाटील,नगरसेवक सुयोग भदाणे, ज्ञानेश्वर सकट, अर्जुन भिल, नगरसेवक प्रतिनिधी गुलाब सोनवणे, संदीप राजपूत,दादा मराठे,माजी उपनगराध्यक्ष प्रकाश देसले, माजी नगरसेवक दीपक चौधरी,राजेंद्र रावल, महेंद्र राजपूत, उमेश राजपूत, संजय राजपुत आदी उपस्थित होते.
![]()
