सत्यध्येय एकविचार | मुक्ताईनगर प्रतिनिधी : आकाश बेलदार
जळगाव येथील धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी परिसरात लोकसेवक स्व. मधुकरराव (बाळासाहेब) चौधरी यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण, दिमाखदार आणि भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. शिक्षण, समाजसेवा आणि लोकहितासाठी आयुष्य वेचलेल्या स्व. बाळासाहेब चौधरी यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या सोहळ्याचे अनावरण महाराष्ट्राचे माजी सरन्यायाधीश मा. न्या. भूषण गवई यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. श्री. हर्षवर्धन सपकाळ, माजी महसूल मंत्री मा. ना. बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून स्व. मधुकरराव (बाळासाहेब) चौधरी यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला.उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात स्व. चौधरी यांनी शिक्षण, सामाजिक बांधिलकी, लोकहित आणि मूल्याधिष्ठित कार्याच्या माध्यमातून उभारलेला आदर्श पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. समाजपरिवर्तनाचा प्रभावी मार्ग म्हणजे शिक्षण असून, त्या माध्यमातून त्यांनी घडविलेल्या कार्याचा वारसा जपणे ही काळाची गरज असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले.याप्रसंगी मा. प्रा. व्ही. एल. माहेश्वरी (कुलगुरू, क.ब.चौ.उ.म.वि., जळगाव), मा. श्री. के. बी. पाटील (माजी कुलगुरू), मा. प्रा. शिवाजीराव पाटील (माजी प्रभारी कुलगुरू), मा. प्रा. एन. के. ठाकरे (माजी कुलगुरू), मा. प्रा. आर. एस. माळी (माजी कुलगुरू), मा. प्रा. पी. पी. पाटील (माजी कुलगुरू) तसेच मा. डॉ. सुधीर तांबे (माजी आमदार, नाशिक पदवीधर मतदारसंघ) यांची विशेष उपस्थिती लाभली.कार्यक्रमाला विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, संस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्व. मधुकरराव (बाळासाहेब) चौधरी यांच्या पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करत त्यांच्या कार्याला भावपूर्ण अभिवादन केले.संपूर्ण परिसरात उत्साह, अभिमान आणि कृतज्ञतेचे वातावरण निर्माण झाले होते. स्व. बाळासाहेब चौधरी यांनी जोपासलेली लोकसेवेची, शिक्षणप्रेमाची आणि समाजहिताची मूल्ये पुढील पिढ्यांनी जतन करून अधिक व्यापक स्वरूपात पुढे नेण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.
![]()
