सत्यध्येय एकविचार शिंदखेडा 🙁 यादवराव सावंत प्रतिनिधी ) :-
येत्या २२ जुलै रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जयंती साजरी होणार आहे. या जयंतीचे औचित्य साधून शिंदखेडा तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायती, जिल्हा परिषद शाळा आणि सर्व माध्यमिक शाळांमध्ये अजितदादा पवार यांच्या प्रतिमा असाव्यात, या हेतूने शिंदखेडा नगरपंचायतीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा श्रीमती कलावती माळी यांच्यातर्फे तालुक्यात प्रतिमांचे वाटप करण्यात आले.नगरपंचायतीचे गटनेते तथा खासदार प्रफुल्लभाई पटेल यांचे स्वीय सहाय्यक राकेशभाऊ माळी यांनी या सर्व प्रतिमा सप्रेम भेट दिल्या आहेत.अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रारंभ या उपक्रमाचा प्रातिनिधिक स्वरूपातील शुभारंभ पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी कार्यालय आणि गटशिक्षणाधिकारी कार्यालय येथे प्रतिमा सुपूर्द करून करण्यात आला.पंचायत समिती कार्यालयामार्फत तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना, तर गटशिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांना या प्रतिमा वितरित केल्या जाणार आहेत.यांची लाभली प्रमुख उपस्थिती हा वितरण सोहळा गटविकास अधिकारी श्रुती कारंडे, उपगटविकास अधिकारी रमेश नेतनराव, गटशिक्षणाधिकारी डी. एस. सोनवणे आणि कार्यालयीन प्रमुख चांदवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.यावेळी नगराध्यक्षा कलावती माळी, नगरसेविका पुष्पाताई सोनवणे, रजूताई सुभाष माळी, सुनीता अरुण देसले, कमलबाई पाटोळे, नगरसेवक अर्जुन भिल, दीपक माळी, राहुल पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुक्यातील सर्वच स्तरांतून या उपक्रमाचे स्वागत केले जात आहे.
![]()
