सत्यध्येय एकविचार चोपडा | प्रतिनिधी
खान्देशच्या भूमीचा अभिमान असलेले, जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील “वामन ॲक्युपंक्चर अँड नॅचरोपॅथी केंद्र” चे संचालक डॉ. पृथ्वीराज सैंदाणे यांना आरोग्यसेवा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल प्रतिष्ठेचा “महा ॲक्युपंक्चर रत्न पुरस्कार 2026” प्रदान करून सन्मानित करण्यात आले. हा भव्य आणि दिमाखदार पुरस्कार सोहळा दि. 19 जुलै 2026 रोजी छत्रपती संभाजीनगर येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात मोठ्या उत्साहात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.आरोग्य क्षेत्रातील विविध उपचारपद्धतींचा प्रचार-प्रसार आणि जनजागृती करणाऱ्या आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन (AIMA) आणि AGMA यांच्या संयुक्त विद्यमाने हा राज्यस्तरीय सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. ॲक्युपंक्चर आणि निसर्गोपचार क्षेत्रात सातत्यपूर्ण, प्रभावी आणि रुग्णकेंद्री सेवा देणाऱ्या निवडक तज्ज्ञांचा या सोहळ्यात गौरव करण्यात आला.डॉ. पृथ्वीराज सैंदाणे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून ॲक्युपंक्चर आणि नॅचरोपॅथीच्या माध्यमातून हजारो रुग्णांना औषधविरहित उपचार व आरोग्यदायी जीवनशैलीचा मार्ग दाखवला आहे. विशेषतः दीर्घकालीन वेदना, सांधेदुखी, मणक्याचे विकार, मज्जातंतूंचे आजार, तणाव, पक्षाघातानंतरचे पुनर्वसन अशा विविध समस्यांवर त्यांनी केलेल्या यशस्वी उपचारांमुळे त्यांच्यावर रुग्णांचा मोठा विश्वास निर्माण झाला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय सेवाकार्याची दखल घेत त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.या पुरस्कार सोहळ्यास मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते डॉ. सुयोग गोरेंद्र, ॲड. नाझिर काझी (प्रदेशाध्यक्ष, अल्पसंख्याक विभाग, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष), ॲड. दत्ता त्रय जाधवर, ॲड. नागेश सोनुने यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.यावेळी AIMA / AGMA चे चेअरमन डॉ. सतीश कराळे, व्हाईस चेअरमन डॉ. नितीनराजे पाटील, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाबुराव कानडे, तसेच डॉ. अभिजीत कवठकर, डॉ. प्रशांत सावंत, डॉ. दिशा चव्हाण, डॉ. स्मिता खारकर, डॉ. विनोद ढोबळे, डॉ. सारंग फुके, डॉ. श्रीधर मेश्राम, डॉ. राजेंद्र गोरे, डॉ. तुषार वाघुळदे, डॉ. विजय पाटील यांच्यासह AIMA / AGMA चे पदाधिकारी, विविध वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ आणि राज्यभरातून आलेले ॲक्युपंक्चर व निसर्गोपचार तज्ज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते.आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन ही आयुर्वेद, योग, सिद्ध, होमिओपॅथी, ॲक्युपंक्चर, निसर्गोपचार आदी विविध उपचारपद्धतींना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देणारी भारतातील अग्रगण्य नोंदणीकृत संस्था असून, पर्यायी उपचारपद्धतींचा प्रसार आणि गुणवंत उपचारकांचा गौरव करण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे.डॉ. पृथ्वीराज सैंदाणे यांना मिळालेल्या या राज्यस्तरीय सन्मानामुळे चोपडा तालुका, जळगाव जिल्हा आणि संपूर्ण खान्देशच्या वैद्यकीय क्षेत्राचा गौरव उंचावला आहे. त्यांच्या या यशाबद्दल वैद्यकीय क्षेत्रातील सहकारी, सामाजिक संस्था, विविध संघटना, रुग्ण आणि नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील सेवाकार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.
![]()
