सत्यध्येय एकविचार शिंदखेडा ( यादवराव सावंत प्रतिनिधी):
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत नागरिकांना विविध महसुली सेवा, लोककल्याणकारी योजनांचा लाभ, तसेच प्रलंबित महसुली प्रकरणांचे तातडीने, पारदर्शक व प्रभावी निराकरण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानातर्गत भव्य शासकीय योजनांच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. येथील बिजासनी मंगल कार्यालयात पार पडलेल्या या शिबिराला शिंदखेडा तालुक्यातील हजारो नागरिकांनी उस्फूर्त विक्रमी प्रतिसाद दिला.जवळपास चार हजार लाभार्थीना लाभ मिळाला असल्याची माहिती प्राप्त झाली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धुळे अप्पर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर हे होते.या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब नारायण पाटील, नगरपंचायत नगराध्यक्षा कलावती माळी,संचालक जिजाबराव सोनवणे, माजी जि. प.विरेंद्र आबा गिरासे, पंकज कदम, माजी सभापती रणजित गिरासे, माजी उपसभापती रणजितसिंह गिरासे,माजी पं. स. सदस्य प्रा. विशाल पवार, प्रवीण मोरे, वाल्मिक आबा पाटील, रघुनाथ पाटील,संचालक पी. एल. पवार, विष्णू पाटील,तहसीलदार नितीन कुमार देवरे, अप्पर तहसीलदार (दोंडाईचा) सुरेश कोळी, गटविकास अधिकारी श्रुती कारंडे, सहाय्यक गटविकास अधिकारी रमेश नेतनराव, गटशिक्षणाधिकारी डी. एस. सोनवणे, नायब तहसीलदार शारदा बागले, विजय गोसावी, संजय राणे, राजेश घोलप, पी. पी. ढोले, नगरसेविका रुजूबाई माळी, सुनीता देसले यांच्यासह तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एकाच छताखाली विविध योजनांचा लाभ
या समाधान शिबिराच्या माध्यमातून शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातील शेतकरी, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच सर्व पात्र लाभार्थ्यांना एकाच ठिकाणी अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.
यामध्ये प्रामुख्याने :
विविध महसुली व कृषी सेवा
विविध प्रकारचे दाखले व प्रमाणपत्रे
दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष कल्याणकारी लाभ
महिला बचत गटांचे मार्गदर्शन व लाभ
एस.टी. सवलत पास वितरण
प्रलंबित महसुली प्रकरणांवर तातडीने तोडगा व मार्गदर्शन
आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहिलेल्या हजारो महिला व पुरुष लाभार्थ्यांच्या विविध प्रश्नांचा आणि अर्जांचा शिबिरात तात्काळ निपटारा करण्यात आला.
अधिकारी व कर्मचाऱ्यांचे यशस्वी नियोजन
शिंदखेडा तहसीलदार नितीनकुमार देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान यशस्वीरीत्या पार पडले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अप्पर तहसीलदार सुरेश कोळी, नायब तहसीलदार शारदा बागले, विजय गोस्वामी, राजेश घोलप, पी. पी. ढोले, अव्वल कारकुन संजय राणे, मंडळ अधिकारी मोहन पगार (शिंदखेडा), अनिता भामरे (शेवाळे), मनोज गोसावी (तामथरे), मोनाली धनगर (वर्षी), स्वाती वाघ (नरडाणा), ग्राम महसूल अधिकारी जितेंद्र चव्हाण, प्रमोद पाढेन, महेश परदेशी तसेच तालुक्यातील सर्व ग्राम महसूल अधिकारी आणि महसूल कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.शिबीराचे प्रास्ताविक तहसीलदार नितीनकुमार देवरे, सुत्रसंचलन सुधाकर पाटील जनता हाय. शिक्षक तर नायब तहसीलदार विजय गोस्वामी यांनी आभार मानले.
नागरिकांचे मत :
“एकाच ठिकाणी सर्व शासकीय योजनांची माहिती आणि प्रत्यक्ष लाभ मिळाल्यामुळे वेळ व पैशांची बचत झाली,” अशी भावना शिबिरात आलेल्या लाभार्थ्यांनी व्यक्त केली.
![]()
