सत्यध्येय एकविचार शिंदखेडा ( यादवराव सावंत,प्रतिनिधी):
कापूस उत्पादनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवून भरघोस उत्पादन घेण्यासोबतच, बोंडअळीसारख्या घातक किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शिंदखेडा तालुक्यातील बाम्हणे येथील केशरानंद जिनिंग फॅक्टरीत कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शेतकऱ्यांना कामगंध सापळ्यांचे (Pheromone Trapping) वाटप करण्यात आले, तसेच शेतीत मोलाचे योगदान देणाऱ्या महिला शेतकऱ्यांचा ‘पैठणी साडी’ देऊन विशेष सन्मान करण्यात आला.कार्यक्रमादरम्यान कृषी क्षेत्रातील मान्यवर तज्ज्ञांनी कपाशीवरील बोंडअळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी शेतात कामगंध सापळ्यांचा योग्य वापर कसा करावा, याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. रासायनिक औषधांचा अवाजवी खर्च टाळून जैविक पद्धतीने किडींचे व्यवस्थापन कसे करावे, याबाबत शेतकऱ्यांना महत्त्वपूर्ण सोप्या टिप्स देण्यात आल्या.कार्यक्रमाची सुरवात कापसाच्या झाडाची पुजा करून दिपप्रज्वलन करुन उदघाटन करण्यात आले.या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी रविंद्र माणगावे होते, तर प्रास्ताविक ज्ञानेश्वर (आबा) भामरे यांनी केले. कॉटन फेडरेशनचे संचालक ज्ञानेश्वर भामरे हे नेहमीच कापूस उत्पादकांच्या हितासाठी विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत असतात.या कार्यक्रमाला कॉटन फेडरेशनचे अध्यक्ष विनय कोटक यांच्यासह डॉ. सी. डी. मयी, भूपेंद्रसिंह राजपाल, करुणाकर शेट्टी, महेंद्र अग्रवाल, वाय. जी. प्रसाद, सुधीर कुमार मंत्री, रितू पांड्या, मनीष डागा, जे. बी. जडे, प्रदीपकुमार मध्यान, उज्ज्वल गिरासे, पंकज पाटील, गोपाल अग्रवाल, अरविंद जैन, भावेश शाह, गिरीष नागवी, विजय बियाणी, प्रकाश पाटील, प्रदीप जैन.स्थानिक लोकप्रतिनिधी मध्ये शामकांत सनेर, भाऊसाहेब कामराज निकम, शानाभाऊ सोनवणे, सर्जेराव पाटील, हेमराज पाटील, माजी सभापती दिलीप साळुंखे, प्रकाश पाटील, अरुण सोनवणे, नगराध्यक्षा कलावती माळी, नंदू चव्हाण आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.शेतीकामात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या महिला शेतकऱ्यांचा पैठणी साडी देऊन गौरव करण्यात आला, ज्यामुळे उपस्थित महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. या कार्यक्रमाला शिंदखेडा तालुक्यासह संपूर्ण धुळे जिल्ह्यातील कापूस उत्पादक महिला व पुरुष शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.सर्व शेतकरीचा टोपी, रुमाल देवुन सन्मान झाला सदर यशस्वी आयोजनाची धुरा केशरानंद जिनिंगचे प्रमुख ज्ञानेश्वर आनंदा भामरे, रविराज भामरे, नरेंद्र भामरे सर आणि शिवराज भामरे यांनी सांभाळली. कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन महेंद्र पाटील सर यांनी केले, तर भूपेंद्रसिंह राजपाल यांनी उपस्थितांचे आभार मानले.

![]()
