शिरपूर: असं म्हणतात की देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि या देशातील गरीब व गरजू व्यक्तीसाठी आपण काहीतरी देणे लागतो आज विद्यार्थ्यांनी स्वखर्चाने अन्नदान उपक्रम आपल्या परिसरात राबवली छोट्या मुलांपासून तर मोठ्या व्यक्तीपर्यंत ज्यांना भेटलो त्यांना जेवण व खाद्यपदार्थांची वाटप केले ह्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या वाढदिवस न साजरा करता हा एक महिना स्वखर्चाने या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांनी पैसे जमा केले.कधीकधी कोणाचे पोट भरण्यासाठी जास्त काही लागत नाही लागते ती फक्त माणुसकी केक *कापून वाढदिवस साजरा करण्यापेक्षा कोणाच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य आणणं..हाचा खरा आनंद* हे आज या विद्यार्थ्यांनी सिद्ध करून दाखवले आरसी पटेल कॉलेज ऑफ इंजीनियरिंग आणि पॉलिटेक्निकच्या (ECE) विद्यार्थ्यांच्या या उपक्रमातून समाजासाठी मोठा संदेश सामाजिक बांधिलकी जपत आणि समाजातील गरजू घटकांसोबत आनंद वाटून घेण्याच्या उद्देशाने यशोदीप मधुकर पालीवाल व कुणाल महाजन आणि मित्रपरिवार यांनी गरजू व वंचित मुलांसाठी अन्नदानाचा उपक्रम राबविला. या उपक्रमात परिसरातील अनेक गरजू मुलांना खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले.आपल्या आनंदाच्या प्रसंगी समाजातील गरजू मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलावे, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुलांना विविध खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले. अन्नपदार्थ मिळाल्यानंतर मुलांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद उपस्थितांसाठी विशेष समाधान देणारा ठरला.आजच्या धावपळीच्या जीवनात सामाजिक जाणीव आणि माणुसकीची भावना जपणे गरजेचे आहे. याच भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. केवळ स्वतःचा आनंद साजरा न करता तो समाजातील गरजू घटकांसोबत वाटून घेतल्याने या उपक्रमाला सामाजिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व प्राप्त झाले.या उपक्रमामध्ये आर्थिक मदत आणि अनमोल सहकार्य विद्यार्थ्यांचे होते यशोदीप मधुकर पालीवाल, कुणाल गणेश महाजन ,संजोग देवरे, हर्षा तवर, मनस्वी सासोटे भाग्यश्री गिरासे.यांनी गरजू मुलांना मदतीचा हात देत त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याचा हा छोटासा प्रयत्न असल्याचे यशोदीप मधुकर पालीवाल यांनी सांगितले.समाजातील प्रत्येक घटकाने आपल्या परीने गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला, तर सामाजिक एकोपा आणि माणुसकीची भावना अधिक दृढ होईल, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
![]()
