सत्यध्येय एकविचार शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी :-
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील शेल्टी गावचे ख्यातनाम सामाजिक कार्यकर्ते श्री. उमाकांत शिवाजी पाटील यांचा नाशिक येथे उच्चपदस्थ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित एका कार्यक्रमादरम्यान नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त (IAS) डॉ. प्रवीण गेडाम आणि नाशिकचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी (IAS) श्री. आयुष प्रसाद यांची श्री. उमाकांत पाटील यांनी सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी श्री. पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन उत्साहात स्वागत केले आणि त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.श्री. उमाकांत पाटील हे दीर्घकाळापासून आदिवासी, दलित आणि इतर सर्व घटकांसाठी कोणत्याही प्रकारचा जातीभेद किंवा धर्मभेद न करता निरंतर कार्यरत आहेत. विशेषतः गोरगरीब व गरजू रुग्णांना स्वखर्चाने दवाखान्यासाठी तसेच वैद्यकीय उपचारांसाठी वेळेवर आर्थिक व प्रत्यक्ष मदत पुरवण्याचे मोठे कार्य ते करत आहेत. त्यांच्या या निस्वार्थ समाजसेवेची दखल घेत विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी त्यांचे विशेष कौतुक करून पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.प्रशासकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या या सन्मानाबद्दल आभार मानताना सामाजिक कार्यकर्ते श्री. उमाकांत पाटील म्हणाले, “तुमच्यासारख्या वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांनी माझ्या कामाची दखल घेऊन केलेला हा सन्मान आणि कौतुक माझ्यासाठी अत्यंत मोलाचे आहे. यामुळे मला भविष्यात अधिक जोमाने व आत्मविश्वासाने सामाजिक कार्य करण्याची नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली आहे.”या प्रसंगी दोन्ही अधिकाऱ्यांनी श्री. पाटील यांच्या भावी वाटचालीस आणि समाजोपयोगी उपक्रमांना पूर्ण सहकार्य व शुभेच्छा व्यक्त केल्या.
![]()
