सत्यध्येय एकविचार शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी :-
येथील ‘शिंदखेडा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित’ या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा आज, बुधवार दिनांक १६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता संस्थेच्या कार्यालयात उत्साहात पार पडली. सदर सभा संस्थेचे विद्यमान चेअरमन सदाशिव नागो पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती सभेच्या सुरुवातीला संस्थेचे सचिव भगवान यशवंत पवार यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखवले. त्यानंतर सभेपुढील विविध विषयांवर सविस्तर विचार-विनिमय करून खालील महत्त्वाचे ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले: मागील वार्षिक सर्वसाधारण सभेच्या प्रोसिडिंगचे वाचन करून त्यास मंजुरी देण्यात आली.सन २०२५-२६ या वर्षाची आर्थिक पत्रिकेसह तेरीज, ताळेबंद आणि नफा-तोटा पत्रक वाचून मंजूर करण्यात आले.सन २०२६-२७ या आगामी वर्षाच्या उत्पन्न व खर्चाच्या अंदाजपत्रकापेक्षा कमी-अधिक होणाऱ्या खर्चास मंजुरी देण्यात आली.सन २०२५-२६ च्या ऑडिट मेमोचे वाचन करून त्यातील दोष दुरुस्ती रिपोर्ट मंजूर करण्यात आला.संस्थेच्या डेडस्टॉकवर १०% प्रमाणे झीज (घसारा) आकारण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.दिनांक २३ मे १९१८ रोजी स्थापन झालेल्या या ऐतिहासिक संस्थेची प्रगती उल्लेखनीय आहे. संस्थेची सद्यस्थिती अशी एकूण शेतकरी सभासद: १,१६९ भागभांडवल: ₹४१ लाख बँक शेअर: ₹२८ लाख ६० हजार कर्जवाटप: ९१ सभासदांना एकूण ₹१ कोटी ३२ लाख ९८ हजार शासकीय कर्जमाफी लाभ: चालू वर्षात ११ सभासदांना ₹११ लाख २८ हजार संस्थेची मुदतठेव: ₹१५ लाख या सभेस गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे, चेअरमन सदाशिव नागो देसले, व्हाईस चेअरमन मनिषा राकेश चौधरी, संचालक दगा तानका चौधरी, रमेश चितामण भामरे, प्रकाश रतन चौधरी, युवराज नामदेव माळी, दिलीप आधार पाटील, बन्सीलाल पितांबर बोरसे, सचिन चंद्रकांत देसले, दिनेश बंडू सूर्यवंशी, मनिष कालिदास पाटील, प्रकाश नथ्थु पाटील, आशाताई भगवान मराठे, सह-सचिव भगवान यशवंत पवार तसेच कर्मचारी अमोल शिंपी, सुशील पावरा व सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
![]()
