सत्यध्येय एकविचार शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी :-
वरपाडा रोडलगतच्या स्मशानभूमीत अंत्यविधी आणि दशक्रियाविधीच्या वेळी मूलभूत सुविधांच्या अभावामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या परिस्थितीला सुधारण्यासाठी बोरवेलची पाइपलाइन दुरुस्त करून नियमित पाणीपुरवठा केला जावा, तसेच जीर्ण आणि तुटलेल्या लोखंडी बॅकेटच्या सळ्या बदलून नवीन मजबूत ब्रैकेट बसवाव्यात, आणि सोलर हायमास्ट लाईटची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशा प्रमुख मागण्या तालुका काँग्रेस अध्यक्ष तसेच माजी नगरसेवक सुनील चौधरी यांनी नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.नगरपंचायतीला दिलेल्या निवेदनात मागणी केली आहे की, स्मशानभूमीत बोअरवेल उपलब्ध आहे, परंतु पाइपलाइनच्या दुरुस्तीअभावी नागरिकांना घरून पाणी वाहून आणावे लागते. या असुविधेमुळे संकटाच्या प्रसंगी धावपळ होते.तसेच, ब्रेकेटच्या जीर्ण सळया बदलून नवीन मजबूत सळया बसविणे अत्यावश्यक आहे. रात्रीच्या अंत्यविधी वेळी प्रकाशाच्या अभावामुळे उदभवणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी सोलर हायमास्ट लाइट लावण्याची मागणीही करण्यात आली आहे.या विषयावर स्मशानभूमीची प्रत्यक्ष पाहणी करून पाणी, प्रकाश तसेच इतर मूलभूत सुविधा तात्काळ पुरवल्या जाव्यात, अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
![]()
