शिरपूर (प्रतिनिधी) :
दिनांक 20 जून 2026 रोजी शासकीय विश्रामगृह, आमोदे येथे मानव विकास पत्रकार संघाची तिमाही आढावा बैठक संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रदीप पवार यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. बैठकीत संघाच्या मागील तिमाहीतील कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला तसेच आगामी उपक्रमांचे नियोजन करण्यात आले.बैठकीत 25 जून रोजी संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रदीप पवार यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच 23 जून रोजी विभागीय सचिव बी. व्ही. गिरासे व शिरपूर तालुका अध्यक्ष कैलास सिसोदिया यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा बॅनर लावण्याबाबत चर्चा करण्यात आली. यासोबतच मानव विकास पत्रकार संघाच्या वतीने विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना “मानव विकास पुरस्कार” देऊन गौरविण्याच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.यावेळी डॉ. प्रदीप पवार यांनी संघटनात्मक विस्ताराच्या दृष्टीने काही महत्त्वपूर्ण नियुक्त्या जाहीर केल्या.
हिराभाऊ रामराव कोळी उर्फ हिरा वाकडे (शिरपुर)– उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष
अर्जुन दिलीप वाघ – (होळनांथे) उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष
मन्साराम भील (जळोद) – धुळे जिल्हा (ग्रामीण) उपाध्यक्ष
रतन भगवान कोळी (लोंढरे) – शिरपूर तालुका उपाध्यक्ष
भरत रुपचंद पगारीया – धुळे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख
या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार प्रदेशाध्यक्ष वसिम खाटीक, विभागीय सचिव बी. व्ही. गिरासे, ॲड. संतोष पाटील आणि पंडीतराव निकुम यांच्या हस्ते करण्यात आला.बैठकीदरम्यान नाशिक विभागीय अध्यक्ष पंडीतराव निकुम यांच्या ज्येष्ठ बंधूंचे दीर्घ वयोमानाने निधन झाल्याबद्दल शोक व्यक्त करण्यात आला. उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून त्यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली.या बैठकीस शहराध्यक्ष भटू भगवान धनगर, तालुका अध्यक्ष कैलास सिसोदिया, मनोज मधुकर सरकार, नरेश बापू गवळे, मोहन शिवाजी जव्हेरी, ज्ञानेश्वर लालचंद पावरा, तुषार दिलीप पाटील, साबीर शफी मनीयार, संतोष कमल थोरात, अर्जुन वाघ, बिस्मिल्ला शहा रमजान शहा, दिनेश संभू कोळी, प्रमोद प्रकाश राठोड, बळीराम हंसराज बंजारा यांच्यासह संघाचे अनेक पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
![]()
