सामाजिक बांधिलकी, निष्पक्ष पत्रकारिता आणि भ्रष्टाचाराविरोधातील ठाम भूमिका यासाठी ओळखल्या जाणाऱ्या “सत्यध्येय एकविचार” या वृत्तपत्राच्या कार्याला आणखी बळ मिळाले असून, श्री. दिनेश रमाशंकर गुप्ता (रा. जेतवान नगर, अंबिवली पूर्व, कल्याण, जि. ठाणे) यांची सह संपादक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.ही नियुक्ती मुख्य संपादक श्री. जितेंद्र सुनील पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करून करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी श्री. गुप्ता यांचे अभिनंदन करत त्यांच्या सामाजिक कार्याची, प्रामाणिकपणाची आणि पत्रकारितेप्रती असलेल्या समर्पणाची प्रशंसा केली.नियुक्तीपत्रात स्पष्ट करण्यात आले आहे की, सत्यध्येय एकविचार हे वृत्तपत्र सत्य, न्याय आणि जनहिताच्या तत्त्वांवर कार्यरत असून कोणत्याही बेकायदेशीर किंवा गैरकृत्यांना पाठिंबा देणार नाही. संस्थेच्या नियम व अटींचे पालन करून निष्पक्ष, जबाबदार आणि लोकहिताची पत्रकारिता करण्याची जबाबदारी सह संपादक म्हणून श्री. गुप्ता यांच्यावर सोपविण्यात आली आहे.मुख्य संपादक श्री. जितेंद्र सुनील पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “पत्रकारिता ही समाजसेवेचे प्रभावी माध्यम आहे. श्री. दिनेश गुप्ता यांची कार्यतत्परता, प्रामाणिकपणा आणि जनहिताची भावना लक्षात घेऊन त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.”या नियुक्तीमुळे सत्यध्येय एकविचारच्या वृत्तांकनाला अधिक बळ मिळणार असून जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि अन्याय, अत्याचार व भ्रष्टाचाराविरोधात अधिक प्रभावीपणे आवाज उठविण्यास मदत होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
![]()
