शिंदखेडा ( प्रतिनिधी ):-
शिंदखेडा तालुक्यातील वारुड येथील भदाणे कुटुंबातील राहुल देविदास भदाणे हा तरुण बारावीला शिकणारा अकरा जुन २०२४ रोजी सकाळी आठ वाजता घरुन हसतखेळत निघाला आणि आजपर्यंत परतलाच नाही.बेटावद येथे क्लासला गेला होता.म्हणून आमचा मुलगा परत आणुन दया अशी आर्त हाक भदाणे कुटुंबीयानी पोलीस प्रशासनाला केविलवाणाने केली आहे. सदर कुटुंब आजही आस लावुन बसलेली अवस्थेत नातलग नव्हे गावकरी ही आतुरतेने वाट पाहत आहेत. आज उद्या राहुलला एक नव्हे तर तब्बल दोन वर्ष झाली. तरीही पोलीस प्रशासन सुस्त आहे की काय अशा प्रश्न निर्माण होत आहे. पहिल्या दिवसापासून राहुलच्या शोधासाठी धुळे पोलीस ठाणे काय तर नाशिक आणि उच्च न्यायालयात देखील चकरा मारून थकले.उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाने आदेश पारित केले असताना ही स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार हयांच्याकडे तपास सोपविला होता. एक कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक म्हणून नावाजलेल्या अधिकारी कडून दिरंगाई होणे ही शोकांतिका आहे.एल. सी. बी. तुन एस. आय. टी. वर्ग आहे. त्याचप्रमाणे स्वतः अपहरण झालेल्या तरुणाचे वडील मुंबई पोलीस महासंचालक श्री. दाते साहेबांची भेटुन आपली कैफियत माडंली.सदरचा तपास तात्काळ हयासाठी तत्कालीन पोलीस अधिक्षक व विदयमान धुळे पोलीस अधिक्षक यांना राहुल चे वडील देविदास भदाणे सह कुटुंबियांनी भेट घेऊन आमच्या मुलाचा शोध लावावा अशीच विनंती केली आहे. ती सार्थ हाक नुतन पोलीस अधिक्षक पोटतिळकीची असल्याने नक्कीच शोधमोहिम जलदगतीने राबविण्याचे आश्वासन दिले असले तरी ही दोन वर्ष होवुनही तपास लागणे म्हणजे शासन प्रशासनाला हरवलेली व्यक्तीची काळजी नसावी का स्वतःच्या पोटचा गोळा दोन वर्षापासून बेपत्ता आहे त्या कुटुंबाचे काळीज काय म्हणत असावे. भदाणे कुटुंब व वारुड ग्रामस्थाकडुन एकच पोलीस प्रशासनाला विनंती आहे एस. आय. टी. सह अजून उच्च मोहिम राबविण्यात यावी. विशेष पथक तैनात करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.तात्काळ विशेष शोध मोहिम राबवून आम्हाला न्याय दया अन्यथा सपुर्ण कुटुंब धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मसमर्पण करणार आहेत.
![]()
