शिंदखेडा (प्रतिनिधी) : शिंदखेडा येथील श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या कै. शं. दे. पाटील (बाबुराव दादा) साहित्य व वाणिज्य महाविद्यालय तसेच कै. भाऊसाहेब मधुकर दिपचंद सिसोदे विज्ञान महाविद्यालयात नुकताच गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था शाखेचे अध्यक्ष प्रफुल्लकुमार सिसोदे होते. व्यासपीठावर उपाध्यक्ष अशोक बापू पाटील, ज्येष्ठ संचालक प्रा. सुरेश देसले, प्राचार्य डॉ. अशुतोष पाटील, उपप्राचार्य विशाल पवार, एस. व्ही. बोरसे आणि एस. टी. राऊळ उपस्थित होते.
प्रास्ताविक प्रा. तुषार करंके यांनी केले. यावेळी विज्ञान विभागातील हितेशा तुलशीदास पाटील, प्रणव दिनेश पवार, सिद्देश हितेंद्र पवार आणि हर्षदा प्रकाश चौधरी यांच्यासह कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच कला विभागातील गायत्री लोटन मिस्तरी, मयुरी वसंत कोळी आणि आकाश संतोष भिल यांनाही गौरविण्यात आले.
महाविद्यालयातील एनसीसीचे विद्यार्थी हर्षल जयसिंग गिरासे, मोहित वासुदेव पाटील आणि राजपालसिंग जयसिंग गिरासे यांची भारतीय सैन्य दलात निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच एनसीसीमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या रोशनी राजेंद्र गिरासे, कल्याणी बोरसे आणि सपना पानपाटील यांचाही सन्मान करण्यात आला.यावेळी ज्येष्ठ प्राध्यापक जे. टी. निकम यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त महाविद्यालयाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. अशुतोष पाटील आणि अध्यक्ष प्रफुल्लकुमार सिसोदे यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक केले. “गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिल्यास त्यांना अधिक मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची प्रेरणा मिळते,” असे ते म्हणाले. तसेच सैन्य दलात निवड झालेल्या आणि विविध क्षेत्रांत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाशी कायम नाळ जोडून ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले.कार्यक्रमास प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. स्वप्नील गागुर्डे यांनी केले.
![]()
