सत्यध्येय एकविचार | शिंदखेडा प्रतिनिधी
आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात शिंदखेडा तालुक्यातील विविध सामाजिक, राजकीय व आंबेडकरी संघटनांनी एकजूट दर्शवत १३ जुलै २०२६ रोजी भव्य मोर्चा काढण्याचा निर्धार केला आहे. या पार्श्वभूमीवर दिनांक ५ जुलै २०२६ रोजी नगरसेवक राहुल भाऊ पाटोळे यांच्या संपर्क कार्यालयात सर्वपक्षीय बैठक पार पडली. बैठकीत “आरक्षण उपवर्गीकरण विरोधी समिती – शिंदखेडा तालुका” या समितीची स्थापना करण्यात आली असून, मोर्चाच्या नियोजनाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.बैठकीत उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आरक्षण उपवर्गीकरणाच्या निर्णयाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत संविधानाने दिलेल्या सामाजिक न्यायाच्या तत्त्वांचे संरक्षण करण्यासाठी लोकशाही मार्गाने व्यापक जनआंदोलन उभारण्याचा निर्धार व्यक्त केला.समितीच्या वतीने शिंदखेडा तालुक्यातील सर्व आंबेडकरी समाजबांधव तसेच अनुसूचित जाती प्रवर्गातील सर्व समाजघटकांना १३ जुलै रोजी सकाळी १०.०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर प्रवेशद्वार, शिंदखेडा येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.या मोर्चामध्ये वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), रिपब्लिकन पार्टी एकतावादी, आदिवासी समाज, मुस्लिम समाज तसेच विविध बहुजनवादी संघटना मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती समितीच्या वतीने देण्यात आली.बैठकीस रामभाऊ माणिक (नगरसेवक, दोंडाईचा), राहुल भाऊ पाटोळे (नगरसेवक, शिंदखेडा), दीपक अहिरे (नगरसेवक, शिंदखेडा), अक्षय चव्हाण (नगरसेवक, दोंडाईचा), अरविंदकुमार मंगासे (जिल्हाध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी एकतावादी), संजय पाटोळे (जिल्हा उपाध्यक्ष, आरपीआय – धुळे), कैलास आखाडे (तालुकाध्यक्ष), प्रवीण मनसे (युवक जिल्हाध्यक्ष), मनोज पानपाटील (पॅंथर सेना तालुकाध्यक्ष), जतिन बोरसे, विजय मोरे, श्रीकांत बैसाणे, बाळा इशी, नवनीत बागले (जिल्हाध्यक्ष), रोहित पाटोळे, संजय पानपाटील, रवींद्र इशी, रावसाहेब पाटोळे, किरण शिरसाट, मनोज बोरसे, दीपक बोरसे, सागर बोरसे, अजय पाटोळे, बबलू कापुरे, तोसीब शेख, सोनू कुंभार, सिद्धार्थ कुवर, कुणाल पाटोळे, यशवंत पाटोळे यांच्यासह शिंदखेडा तालुक्यातील आंबेडकरी समाजाचे अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.बैठकीत मोर्चा शांततापूर्ण, शिस्तबद्ध आणि मोठ्या प्रमाणावर यशस्वी करण्यासाठी गावोगावी जनजागृती मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. आगामी मोर्चात तालुक्यातील हजारो नागरिक सहभागी होतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
![]()
