सत्यध्येय एकविचार शिरपूर प्रतिनिधी :
शिरपूर शहरातील अंबिका नगर परिसरात लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात, शिस्तबद्ध वातावरणात आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देत भव्य स्वरूपात साजरी करण्यात आली. समाजप्रबोधन, समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा विचार जनमानसात रुजविणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपस्थित मान्यवरांनी त्यांना अभिवादन केले. यावेळी त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा जागर घालत तरुणांनी समाज परिवर्तनासाठी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना तालुकाप्रमुख हेमंतभाऊ गुलाबराव पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख कन्हैया चौधरी, नगरसेवक चंद्रकांत ठानसिंग पाटील तसेच शिवसेना शहरप्रमुख विकीभाऊ चौधरी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर शिवसेना अल्पसंख्याक तालुकाप्रमुख सलमान काझी, जनसेवक योगी हटकर, पांडुरंग गोसावी, पिंटूभाऊ शिरसाठ, सतीश थोरात, रोशन थोरात, महेंद्र कढरे, आयुष्मान थोरात, निलेश भोई आणि राहुल शेटे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.कार्यक्रमात जनसेवक योगी हटकर आणि आयुष्मान थोरात यांनी मार्गदर्शन करताना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या संघर्षमय जीवनप्रवासावर सविस्तर प्रकाश टाकला. त्यांनी आपल्या भाषणातून अण्णाभाऊंच्या साहित्याची सामाजिक परिवर्तनातील भूमिका अधोरेखित करत त्यांच्या क्रांतिकारी विचारांमधून आजच्या तरुणांनी प्रेरणा घेऊन शिक्षण, संघटन आणि समाजहितासाठी कार्य करण्याचे आवाहन केले.या कार्यक्रमाचे प्रभावी आणि उत्कृष्ट सूत्रसंचालन धम्मदीप मोरे यांनी केले. त्यांच्या ओघवत्या निवेदनामुळे संपूर्ण कार्यक्रमाला वेगळी उंची प्राप्त झाली.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आबासो प्रसाद पाटील, ज्वाला मोरे सर, सतीश थोरात आणि जनसेवक योगी हटकर यांचे विशेष आणि अनमोल सहकार्य लाभले.या भव्य सोहळ्याच्या यशामागे उत्सव समितीचे अध्यक्ष गणेश बाशिंगे, उपाध्यक्ष नागेश गायकवाड तसेच राहुल बाशिंगे, मिलिंद धनगर, प्रेम वाघ, विशाल भोंगे, सागर भोंगे, विकी भोंगे, कृष्णा मांडोळे, आनंद भोगे, महेंद्र सोनवणे आणि भरत बाशिंगे यांनी अथक परिश्रम घेतले.अंबिका नगर परिसरातील मातंग समाज बांधवांसह विविध समाजघटकांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध आणि सामाजिक ऐक्याचे दर्शन घडविणाऱ्या वातावरणात पार पडला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा आणि समाजातील वंचित घटकांच्या उन्नतीसाठी कार्य करण्याचा निर्धार उपस्थितांनी यावेळी व्यक्त केला.
![]()
