शिरपूर | प्रतिनिधी
शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवार दि. १९ जून २०२६ रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत शिरपूर येथील कै. बापूसो एन. झेड. मराठे, थाळनेर संचलित अनाथ मतिमंद मुलांचे बालगृह येथे दुपारच्या जेवणाची विशेष व्यवस्था करण्यात आली. तालुक्यातील पदाधिकारी व शिवसैनिकांनी बालगृहातील मुलांसोबत वेळ घालवत त्यांना प्रेम, आपुलकी आणि मायेचा आधार देत वर्धापन दिन साजरा केला.हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिलेला “८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण” हा संदेश आजही शिवसेनेच्या कार्यपद्धतीचा आधारस्तंभ असून त्याच विचारांचा वारसा जपत शिवसेना (उ.बा.ठा.) च्या पदाधिकाऱ्यांनी हा उपक्रम राबविला. केवळ राजकीय कार्यक्रम न करता समाजातील गरजू, वंचित आणि विशेष मुलांसाठी सेवा कार्य करणे हीच खरी बाळासाहेबांना आदरांजली असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या सामाजिक उपक्रमात उपजिल्हाप्रमुख भरत राजपूत, उपजिल्हा संघटक राजू टेलर, विभाभाई जोगराणा, उपजिल्हा समन्वयक अभय भदाणे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, तालुका समन्वयक पिंटू शिंदे, शहर प्रमुख देवाजी पाटील, उपशहर प्रमुख वज्जू मलिक, उपतालुका प्रमुख मंगल भोई, महेश चौधरी, युवासेना शहर प्रमुख बबलू शेख, बभळाज येथील सचिन साहेबराव पाटील, भाईदास झगडू भील, किरण पांडुरंग पवार तसेच अविनाश आत्माराम मोरे यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.बालगृहातील मुलांना पौष्टिक व स्वादिष्ट भोजन देण्यात आले. यावेळी मुलांशी संवाद साधत त्यांच्या शिक्षण, आरोग्य व सर्वांगीण विकासासाठी समाजाने पुढे येण्याचे आवाहनही करण्यात आले. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी अशा सेवा उपक्रमांमधून समाजातील दुर्बल घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त केला.शिवसेनेच्या स्थापनेपासून समाजहित, जनकल्याण आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करण्याची परंपरा राहिली आहे. वर्धापन दिनाच्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा जपला जात असून, समाजकारणाच्या माध्यमातूनच संघटनेची खरी ताकद दिसून येत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
![]()
